Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : "हे शहाणपणाचे..."; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांचा सुजय...

Sharad Pawar : “हे शहाणपणाचे…”; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांचा सुजय विखेंना टोला

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज लोकसभेत इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली.त्यामुळे लंके यांच्या शपथेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचारावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी ‘रील’ पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला (MP) आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. ‘काहीजण फक्त रिल्स करून काम केल्याचा आव आणतात’ असे म्हणत डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवली होती.

हे देखील वाचा : निलेश लंकेंनी सुजय विखेंचे आव्हान स्वीकारले; इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

यामध्ये डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी संसदेत इंग्रजीतून केलेल्या भाषणांचा समावेश होता. त्यानंतर डॉ.सुजय विखे यांनी “मी जेवढं इंग्रजी बोलतो, तेवढं समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही,” असे म्हणत निलेश लंके यांना आव्हान दिले होते. यानंतर आज निलेश लंके यांनी डॉ.सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारले होते. त्यानंतर आज निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी चक्क इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली. त्यामुळे लंके यांनी विखेंचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लंकेंचे कौतुक करत विखेंना टोला लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे देखील वाचा : लोकसभा अध्यक्षपदासाठी इतिहासात पहिल्यांदा होणार निवडणूक; ‘हे’ आहेत उमेदवार

यावेळी शरद पवार म्हणाले की, “संसदेत इंग्रजी आणि मराठीसह कोणत्याही भाषेत बोलता येते.एखादा व्यक्ती जन माणसांत काम करून देशाच्या संसदेत जात असेल आणि त्याच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.मला वाटते त्याचे उत्तर निलेश लंकेंनी विखेंना दिले असून याचा मला आनंद आहे”, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सुजय विखे निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतलेल्या शपथेवर काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर

दरम्यान, निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी डॉ. सुजय विखे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत २८ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी अहमदनगरमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने (Court) ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता आगामी काळात लंके आणि विखे यांच्यातील राजकीय लढाई अशीच सुरु राहण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या