Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर

मोठी बातमी! पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर

पुणे पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पुण्यातील कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही महागडी कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना (Pune Police) मोठा बसला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची लवकरच सुधारगृहातून सुटका होणार असून त्याला त्याच्या आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

हे देखील वाचा : निलेश लंकेंनी सुजय विखेंचे आव्हान स्वीकारले; इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

सदर अल्पवयीन मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचा मुलगा आहे.अपघात झाल्यानंतर या मुलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून जामीन दिला होता. ज्यामुळे पुण्यात आणि समाजमाध्यमांवर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर या अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.

हे देखील वाचा : लोकसभा अध्यक्षपदासाठी इतिहासात पहिल्यांदा होणार निवडणूक; ‘हे’ आहेत उमेदवार

दरम्यान, यानंतर याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आत्येने मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. या याचिकेतून जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. मुलाची आत्या पूजा जैनने हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारत अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला. त्यांनतर आता या अल्पवयीन मुलाला त्याच्या आत्येच्या ताब्यात देण्यात येणार असून त्याचे समुपदेशन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या