Tuesday, July 23, 2024
Homeराजकीयनिलेश लंकेंनी सुजय विखेंचे आव्हान स्वीकारले; इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

निलेश लंकेंनी सुजय विखेंचे आव्हान स्वीकारले; इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचारावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी ‘रील’ पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला (MP) आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. ‘काहीजण फक्त रिल्स करून काम केल्याचा आव आणतात’ असे म्हणत आमदार जगताप यांनी डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवली होती. यामध्ये डॉ. सुजय विखे यांनी संसदेत इंग्रजीतून केलेल्या भाषणांचा समावेश होता.

हे देखील वाचा : राज्यातील ‘हे’ ३० नवे चेहरे खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत मांडणार मतदारसंघातील प्रश्न

त्यानंतर डॉ.सुजय विखे यांनी “मी जेवढं इंग्रजी बोलतो, तेवढं समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही,” असे म्हणत निलेश लंके यांना आव्हान दिले होते. यानंतर आता नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे-पाटील यांचे आव्हान स्वीकारत संसदेत महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांची ही शपथ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यातील नऊ धरणे कोरडी; पाणीसाठा ७.६८ टक्क्यांवर

दरम्यान, निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी डॉ. सुजय विखे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत २८ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने (Court) ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर आता लंके यांनी विखेंचे इंगजीतून बोलण्याचे आव्हान पूर्ण केल्याने आगामी काळात त्यांच्यातील ही राजकीय लढाई अशीच सुरु राहण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या