Sunday, May 5, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर: हरसूल भागात ८०व्या वाढदिवसानिमित्त ८० पातळाचे वाटप

त्र्यंबकेश्वर: हरसूल भागात ८०व्या वाढदिवसानिमित्त ८० पातळाचे वाटप

हरसूल l प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा. वाढदिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. तसेच हरसूल भागात शरद पवार यांच्या ८०व्या. वाढदिवसानिमित्त फळे व गोरगरिबांना ८० पातळाचे (वस्त्र) वाटप करण्यात आले.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना केळी, सफरचंद, चिकू आदी फळांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बहिरु मूळाने, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, माजी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, सामजिक कार्यकर्त्यां भारती भोये, महिला तालुकाध्यक्षा भारती खिरारी, हरसुलच्या सरपंच सविता गावित आदींच्या हस्ते रुग्णासह नातेवाईकांना वाटप करण्यात आले. तसेच ८० व्या. वाढदिवसानिमित्त ८० पातळाचे (वस्त्र) हरसूल जवळील वैतागवाडी, पवारपाडा, अंबोली, पिंपरी (त्र्यंबक) येथे मान्यवरांनी वाटप केले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील तुपादेवी फाटा आधारतीर्थ याठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी हरसूल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी चेतन ठोबरे, गोकुळ बत्तासे, योगेश देवरगावकर, हरसूल ग्रामपंचायत सदस्य अनिल बोरसे, शकील पठाण, सलमा शेख, छाया पवार, संजय आहेर, छबिलदास बाविस्कर, रमेश हिलीम, उषा सकटे, संजू भोये, विनया वाघ, कुलकर्णी, अर्चना खाडे आदींसह रुग्ण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या