Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik News : शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने घेतली भुजबळांची भेट; दोघांमध्ये बंद...

Nashik News : शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने घेतली भुजबळांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा

नाशिक | Nashik

- Advertisement -

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची आज नाशिक (Nashik) येथील भुजबळ फार्म हाऊसवर दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते श्रीराम शेटे यांनी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा :  Maharashtra Weather : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

श्रीराम शेटे (Shriram Shete) हे कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र, असे असले तरी काही दिवसांपूर्वी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेटे यांच्या साखर कारखान्याला भेट दिली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. त्यानंतर आज त्यांनी थेट मंत्री भुजबळ यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

हे देखील वाचा : नाफेड कांदा घोटाळ्याची चौकशी; पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रारीची दखल

तसेच आजच्या भेटीत भुजबळ आणि शेटे यांच्यात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही. तसेच शेटे यांच्या निकटवर्तीयांनी देखील भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांना निवडून आणण्यात श्रीराम शेटे यांचा मोठा वाटा आहे.

हे देखील वाचा : Amit Shah on Rahul Gandhi : “जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत…”; अमित शाहांचा राहुल गांधींना इशारा

दरम्यान, मंत्री भुजबळ हे जाहीरपणे वक्तव्य करीत नसले तरीही ते महायुतीमध्ये आनंदी नसल्याचे त्यांनी घेतलेल्या विविध भूमिकांमधून दिसून आले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात देखील अनेक राजकीय घडामोडी घडत असून या पक्षातील अनेक आमदार आणि काही मंत्री शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यातच आज भुजबळ आणि शेटे यांच्यात भेट झाल्याने काही नवीन राजकीय घडामोडी घडतात की काय अशा चर्चा झडू लागल्या आहेत.मात्र या चर्चांना कुणीही खात्रीशीर दुजोरा दिलेला नाही.पंरतु, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या