Monday, November 11, 2024
Homeमहाराष्ट्रनाफेड कांदा घोटाळ्याची चौकशी; पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रारीची दखल

नाफेड कांदा घोटाळ्याची चौकशी; पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रारीची दखल

पथक दाखल

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर | Pimpalgaon Baswant

नाफेडमधील (Nafed) काही भ्रष्ट अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संबंध नसणाऱ्या काही घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून होत असलेल्या कोट्यवधींचा कांदा गैरव्यवहाराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने (Prime Minister Office) घेतली आहे. दोन अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी (दि.१०) दुपारी १ च्या सुमारास नाफेड कार्यालयावर पोहोचले. जवळपास तीन तास येथील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Weather : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

यावेळी काही शेतकऱ्यांच्या (Farmers) वतीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधत याबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून या पथकाने पाहणी केली.केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी व फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. तर कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. कष्टाचे दाम न मिळता परस्पर केंद्र शासनाच्या (Central Government) डोळ्यात धूळफेक करून कोट्यवधीचा घोटाळा करणाऱ्या प्रोड्यूसर कंपन्या व काही राजकीय लागेबांधे असणाऱ्या पुढाऱ्यांचे चेहरे समोर येणार आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून नाफेडच्या कांदा (Onion) खरेदीची एक यादीच व्हायरल झाली होती. या यादीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. या सर्वांचा पर्दाफाश झाल्यावर कांदा उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. याच दरम्यान येवला (Yeola) येथील एका शेतकऱ्याने नाफेडमधील कांदा खरेदीतील घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेऊन नाफेडच्या झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे देखील वाचा : नाशिक – बंगळुरू विमानसेवेला प्रारंभ

दरम्यान, या दक्षता पथकात गुजरात (Gujarat) येथील नाफेडच्या विभागीय कार्यालयातील सरव्यवस्थापिका वीणा कुमारी आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी कांदा खरेदीतील घोटाळा, गैरप्रकार आणि अनियमितता यांची चौकशी करणार असल्याने नाफेडमधील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही राजकीय नेते आणि उत्पादक कंपन्यांची धावपळ सुरू असून अनेकांचे धाबे दणाणले आहे.

हे देखील वाचा : शिष्यवृत्तीत एकसमानता आणण्यासाठी समिती गठीत; सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी

ज्या शेतकऱ्यांनी कांदाच लावला नाही, त्या शेतकऱ्यांचा कांदा दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. तसेच अधिकाऱ्यांनी लागेबांधे असलेल्या नेत्यांनी कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहेत तो जवळपास ४०० कोटींचा घोटाळा आहे. या कंपन्या व त्या नेत्यांनी समोर यावे. अन्यथा, यासाठी लवकरच राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

किरण सानप, कांदा आंदोलक शेतकरी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या