दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) हे सर्वसमावेशक नेतृत्त्व असून सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी देणारे तसेच कामगार, कष्टकरी, शेतकरी व सर्व सामान्यांसाठी झटणारे आहे. त्याचे विचार तळागाळातील जनते पर्यत पोहोचवण्याचे काम युवकांनी करावे’, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख ( State President of Nationalist Youth Congress Mahboob Sheikh )यांनी केले.
शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित शरद युवा सवांद ( Sharad Yuva Sanvad Yatra ) यात्रा काल दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka ) आली. शहरातील आदीवासी सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी महेबुब शेख बोलत होते.
महेबुब शेख पुढे म्हणाले की, श्रीराम शेटेंपासून ते नरहरी झिरवाळांपर्यत अनेक निष्टावंत शरद पवार यांच्या पाठीशी उभे केले असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम ताकदीने तालुक्यात उभा आहे. महाविकास आघाडी सरकार सर्व सामान्यांसाठी काम करत असुन भाजपा मात्र ईडी, सिबीआय, एनसिबी सारख्यां संस्थेचा गैरवापर करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जनता सरकारच्या पाठीमागे भक्कम पने उभी असल्याने काळजी करण्याची काम नाही.
कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी भावी काळात तरूण चेहर्यांनी पुढे येवुन संघटना बळकट करण्यास हातभार लावावा व जागा अडवून बसलेल्या पन काम न करणार्या पदाधिकारी यांनी थांबवुन नवीन युवकांना संधी द्यावी. पुढील काळात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, कारखाना व इतर महत्वाच्या निवडणुकांमध्ये अधिक ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुन आणावे असे आवाहन शेख यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शाम हिरे यांनी प्रास्ताविकमध्ये पुढील काळात तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परीषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये युवकांना जास्तीत जास्त संधी मिळावी ही भूमिका मांडली. बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे व रायुकॉचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग आदींनी मनोगत व्यक्त केले.
शिवसेना महीला तालुका संघटक उज्वला बोराडे यांनी असंख्य महीलासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व त्यांची नियुक्ती वणी महीला शहराध्यक्ष पदी नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
राहुल शिंदे, चेतन देशमुख व देवीदास गोवर्धने आदी युवकांनी शिवसेनेतुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी युवक निरीक्षक अजित घुले, शहाजी सोमवंशी, शंकरराव काठे, अशोक टोंगारे, नामदेव घडवजे, शंकर वाघ, चंदर भोये, शरद काठे, गणेश तिडके, गंगाधर निखाडे, छबुराव मटाले, तुकाराम जोंधळे, संदीप भेरे, राहुल गायकवाड, दुर्गेश चित्तोडे, अतुल पताडे, ललित देशमुख, मनोज देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तौसिफ मनियार यांनी मानले.




