Friday, July 3, 2026
HomeUncategorizedशेगाव : आठ लाखाचा गुटखा जप्त

शेगाव : आठ लाखाचा गुटखा जप्त

शेगाव  – 

शेगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी श्री अग्रसेन महाराज चौक येथे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन थांबवून चौकशी केली असता वाहनात 22 पोते वाह व पानबहार पान मसाला गुटख्याचे 22 पोते आढळून आल्याने वाहनासह एकूण 7,70,125 रूपयाचा ऐवज जप्त केल्याची घटना दि.27 रोजी पहाटे 4 वाजता घडली.

- Advertisement -

पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कमलेश खंडारे, पोउपनि नितीनकुमार इंगोले, यांच्यासह पोलीस पथकांनी सापळा रचून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप वाहन थांबवले .

वाहनचालक करण सतिष गवळी (वय 22) राहणार चांदमारी ता.खामगाव याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने वाहनाची झडती घेतली .

वाहनात वाह व पानबहार पानमसाला गुटखा असा 22 पोते गुटखा किंमत 3,70,125 रूपये व महिंद्र वाहन किंमत 4 लाख असा एकूण 7,70, 125 रूपये किमंतीचा एवज शेगाव पोलीसांनी जप्त केला असून ,

गुटखा मालधारक करण सतिष गवळी याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरूध्द कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासन अधिकारी खामगाव यांच्याकडे शेगाव पोलीसांनी अहवाल दिला आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...