मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे.या कामांमध्ये कोरोना केंद्रांची उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी प्रकल्प, भिंडीबाजार पुनर्विकास अशा महत्वाच्या कामांचा समावेश यामध्ये आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर ही चौकशी म्हणजेच ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
- Advertisement -
गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती ‘कॅग’ने मान्य केली. कॅग ही कोणत्याही सरकारी कामांची परीक्षण करणारी केंद्र सरकारची सर्वोच्च यंत्रणा आहे. दरम्यान मुंबई महापालिकेतील विविध कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वी भाजपकडून करण्यात आला होता.