Monday, April 27, 2026
HomeनगरAhilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

सीसीटीव्ही’ बंद ठेवण्याची सक्ती अन् कूकचा खुलासा

नाशिक |प्रतिनिधी| Nashik

स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले आहे. खरातच्या बेडरूमसह फार्म हाऊसवरील अश्लील चाळ्यांपासून ते भक्तांच्या लुटीपर्यंतचा काळा चिट्ठा 160 जीबीच्या पुराव्यासह सर्वप्रथम शिर्डी पोलिसांच्या टेबलावर पोहोचला होता.

- Advertisement -

खरात प्रकरणाची सुरुवात त्याच्या सिन्नरमधील मिरगावच्या फार्म हाऊसवरील एका कूकपासून झाली. खरात तेथे येण्यापूर्वी कूकला सीसीटीव्ही बंद करण्यास सांगत असे. मात्र, कूकने केवळ संशयावरून नव्हे तर प्रत्यक्ष डोळ्यांनी खरातचे महिलांसोबतचे अश्लिल वर्तन आणि नशेत केलेले कृत्य पाहिले होते. हा कूक खरातच्या दहशतीखाली होता, मात्र त्याने ही माहिती खरातच्याच एका जवळच्या चालकापर्यंत (ड्रायव्हर) पोहोचवली आणि तिथूनच या भोंदूच्या अंताची ठिणगी पडली. खरातचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सर्वात मोठी जोखीम ऑफिस बॉयने उचलली. खरातच्या कार्यालयात आणि वैयक्तिक केबिनमध्ये त्याने गुपचूप स्पाय कॅमेरा बसवला. उमाकांत तायडे यांच्या मदतीने या कॅमेर्‍यात जे काही चित्रित झाले, ते पाहून खरातचे तत्कालिन बडे समर्थकही हादरले.

या व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत अश्लिल चाळे करताना आणि लोकांना फसवताना स्पष्टपणे कैद झाला. हे पुरावे मिळताच खरातच्या दहशतीला न जुमानता ऑफिसबॉयला राजेंद्र जासूद, दिनेश परब आणि ललित पोफळे यांनी मानसिक आधार दिला व हे प्रकरण शिर्डी पोलिसांपर्यंत पोहोचले.
एकेकाळी खरातला देव मानणारे राजेंद्र जासूद आणि इतर भक्तांनी जेव्हा त्याचे सत्य पाहिले, तेव्हा त्यांनीच या पापाचा घडा फोडण्याचे ठरवले. अशोक भालेराव यांच्या माध्यमातून 160 जीबी डेटा पोलिसांना देऊन त्यांनी खरातची रवानगी कोठडीत केली. सध्या पोलीस या व्हिडिओंची तांत्रिक तपासणी करत असून, या माध्यमातून अनेक बड्यांची नावे फुटण्याची शक्यता आहे.

खरातला सहाव्या गुन्ह्यातही न्यायालयीन कोठडी
नाशिक सत्र न्यायालयाने भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर विशेष तपास पथकाने त्याला सातव्या गुन्ह्यासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी रीतसर अर्ज सादर केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात 41.2 अंश सेल्सिअसची नोंद; जिवाची लाही लाही

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल 41 ते 45 अंश...