Thursday, May 2, 2024
Homeनगरशिर्डीत महिलेच्या गळ्यावर वार करत स्वतःच्या गळ्यावरही युवकाचे वार

शिर्डीत महिलेच्या गळ्यावर वार करत स्वतःच्या गळ्यावरही युवकाचे वार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील विवेकानंद उपनगरात एका युवकाने धारदार शस्राने विवाहित महिलेच्या गळ्यावर वार करत स्वतःच्या गळ्यावर वार करून जखमी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

शिर्डी येथील स्वामी विवेकानंद नगरात राहणारे भाटे कुटुंबियांचा आज लग्नाचा वाढदिवस होता, त्यानिमित्त सायंकाळी वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या राहत्या घरी एक युुुवक उपस्थित होता. यादरम्यान त्यांच्यात काही वाद झाल्याने त्या युवकाने भाटे कुटुंबियांवर धारदार शस्राने वार करून स्वतःवरही वार केले.

जखमी झालेल्या महिलेला तात्काळ उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. शिर्डी पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहे.

या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान महिलेवर तातडीने उपचार केल्याने तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, मात्र युवकाला जास्त इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या