Thursday, March 13, 2025
Homeनगरदुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

मृत कामगारांच्या मुलींचा ग्रामसभेत आक्रोश || शिर्डीतील गुन्हेगारीचा महिन्याच्या आत बंदोबस्त न केल्यास पोलीस ठाण्याला कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आरोपीला फाशी देऊन आम्हाला न्याय मिळवून द्या असा टाहो फोडत शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात मृत्यू झालेल्या दोन कामगारांच्या मुलींनी करत आरोपींना कठोर शिक्षा कारवाईची मागणी शिर्डीतील आयोजित केलेल्या ग्रामसभेत कली. यावेळी उपस्थित असलेल्या शिर्डी ग्रामस्थांनी या दुर्दैवी झालेला घटनेचा निषेध करत पोलिसांच्या दुर्लक्षेमुळे शिर्डीत सुरू असलेल्या अवैध धंदे वाढत असलेली गुन्हेगारी व ग्रामस्थांकडून तक्रार पेटीत दाखल झालेल्या विविध विषयांच्या तक्रारींचा पाढा वाचत पोलिसांनी शिर्डीतील गुन्हेगारीचा एक महिन्याच्या आत बंदोबस्त न केल्यास पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी कुलूप ठोकण्याचा इशारा देत शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ग्रामस्थ हातात दंडूके घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा ग्रामस्थांनी पोलिसांना ग्रामसभेत दिला.

- Advertisement -

शिर्डीतील साईबाबा संस्थानमध्ये सेवेत असलेले सुभाष घोडे व नितीन शेजुळ तसेच शिर्डीतील ग्रामस्थ कृष्णा देहरकर यांच्यावर 6 फेब्रुवारी रोजी पहाटे शिर्डीत दोन गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या दोन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. त्यात सुभाष घोडे व नितीन शेजुळ या संस्थांमध्ये कामावर जाताना दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कृष्णा देहरकर यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याने त्यांच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहे. शिर्डीत हे दुहेरी हत्याकांड करणारे दोघे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तडीपारीचे गुन्हे दाखल असताना देखील आरोपी पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे मोकाट असल्याने त्यांनी हा गुन्हा केला.

हे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करत पोलिसांच्या आशीर्वादामुळे शिर्डीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याने या ठिकाणी गुन्हेगारी वाढत असून या गुन्हेगारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शिर्डीत सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ग्रामसभेचे आयोजन करून चार-पाच दिवसांपूर्वी मारुती मंदिरात ठेवलेल्या तक्रार पेटीत नागरिकांनी शिर्डी शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत तक्रारी पेटीत टाकण्याचे आवाहन केले होते. या तक्रार पेटीत दाखल झालेल्या तक्रारी तसेच शिर्डीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे या दोन व्यक्तींना आपला जीव गमावा लागला. शिर्डीत अनेक राज्यातील तडीपार गुन्हेगार शिर्डीत फिरतात. परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीचे रॅकेट आहे याची पोलिसांना माहिती असताना देखील कारवाई केली जात नाही. तसेच काही हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय केला जातो. शिर्डीतील काही दुकानदार भाविकांना फुल हार तसेच विविध वस्तू मनमानी दर घेऊन विकतात.

अवैध व्यवसाय करणार्‍या तसेच भाविकांकडून वस्तू विक्रीचे जादा दर घेणार्‍या दुकान व हॉटेल मालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. शिर्डीतील अवैध वाहतूक व्यवसाय बंद करा, नशेची साधन पुरवणारांवर कारवाया करा, सीसीटीव्ही कंट्रोल मध्ये पोलीसांचे दुर्लक्ष नको, कोणत्याही गुन्हेगारांच्या कार्यक्रमात जाऊ नका फ्लेक्सवर फोटो छापू देऊ नका, मारुती मंदिर व कानिफनाथ मंदिर चौकात, बसस्थानक, कालिकानगर, श्रीरामनगर या ठिकाणी पोलीस चौक्या सुरू करा, ग्रामसुरक्षा दल व कृतीदलमध्ये सामील व्हा, भाडेकरूंचे व्हेरिफिकेशन व नोंदणी करा, उपनगरातही गस्त घाला, नगरपरिषद कॉम्प्लेक्स इमारती वरील गर्दुल्लेवर कारवाया करा, घटनेतील मयतांच्या वारसांना संस्थानात नोकरी द्या, महाविद्यालय शहराबाहेर तिकडेही टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त करा, रात्री साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत व्यवहार पूर्ण बंद ठेवा, भाविकांची फसवणूक करणार्‍या एजंट, दुकानदार, त्यांचे मालक याच्यावर गुन्हा दाखल करा, शहरातील खाजगी सावकारकी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तिला आळा घाला. शहरातील लहानमोठ्या गुन्हेगारांना मकोका लावा. भाविकांना फसवणार्‍या, लुटणार्‍याची यापुढे गय केली जाणार नाही असा शिर्डीतील नागरिक व भाविकांना होणारा त्रास तसेच शिर्डीत कोणत्या ठिकाणी गुटखा, दारू, मटका राजरोसपणे कुठे विकला जातो तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहने किती याचा आकडा व माहिती ग्रामस्थांनी पोलिसांसमोर वाचून दाखवली.

यावेळी कमलाकर कोते, अभय शेळके, कैलासबापू कोते, शिवाजी गोंदकर, राजेंद्र गोंदकर, विजय जगताप, दत्ता कोते, रमेश गोंदकर, दीपक वारुळे, विक्रांत वाकचौरे, सचिन चौघुले, दत्ता आसने, गोपी परदेशी, राजेश लुटे, सुरेश आरणे, रवींद्र गोंदकर, माधुरी शिंदे, सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सचिन तांबे, नितीन कोते, ताराचंद कोते, निलेश कोते तसेच घोडे, शेजुळ व देहरकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत तीव्रपणे आपल्या भावना व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. शिर्डीतील नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यांनी ती कारवाई सातत्याने सुरू ठेवावी तसेच संस्थान प्रशासनाने मंदिर परिसराच्या बाहेर देखील भाविकांना नशेखर व टारगट व्यक्तींकडून त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी फिरते पथक नेमावे अशी यावेळी ग्रामस्थांनी मागणी केली. यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर होते तर यावेळी अरविंद कोते, उत्तम कौते, विलास कोते, विठ्ठलराव जाधव, देवराम सजन, सुनील परदेशी, अमृत गायके, अशोक गायके, मधुकरराव कोते, आप्पासाहेब कोते, विकास गोंदकर, सचिन कोते व शिर्डीतील महिला पुरुष तसेच योग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...