शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीत (Shirdi) सोमवारी पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचे (Shirdi Double Murder) पडसाद राज्यासह देशभर उमटले. या घटनेत शिर्डीचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार (Police Inspector Ramkrishna Kumbhar) यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली (Transfer) करण्यात आली. त्यांच्या जागी राहात्याचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली. राहात्याला (Rahata) गलांडे यांच्या जागी नितिन चव्हाण यांची नेमणूक झाली आहे. मात्र खुनाची घटना अपघात असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस हवालदारावर मात्र कारवाई झाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आरोपी किरण सदाफुले याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 10 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 40 पोलिसांची पाच पथके दुसर्या आरोपीचा (Accused) शोध घेत आहेत.
दुहेरी हत्याकांडांत साई संस्थांनच्या दोन कर्मचार्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेतील मुख्य दोन्ही आरोपी शिर्डीतील (Shirdi) गणेशवाडी येथे दुसर्याच्या जागेत राहतात. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर सोमवारी आरोपी राहतात तेथील मूळ मालकाने त्यांना घर खाली करण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी ते घर खाली न केल्याने मंगळवारी सकाळी जागा मालकाने जेसीबी (JCB) आणून त्यांना ते घर खाली करण्यास सांगितले. परंतु आरोपींच्या नातेवाईकांनी घर खाली करण्यास नाकार देऊन मोठा गोंधळ घातला. त्यामुळे जमीन मालकांनी त्यांना त्यांचे घर खाली करण्यासाठी आनखी एक दिवसाची मुदत दिली असल्याच समजते.
सोमवार घडलेल्या घटनेनंतर उशीर का होईना पण पोलिस ऍक्शन मोडवर आल्याने अनेक गुन्हेगारांनी शिर्डीतून पालायण केले आहे. या घटनेच्या पार्शवभूमीवर शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी शासकीय विश्रामगृह येथे ग्रामसभा घेण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिर्डीतील गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायांचा कायमचाच बिमोड करण्यासंदर्भात ग्रामस्थांनी मते मांडली.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासन सतर्क झाले. आज दुपारपर्यंत शिर्डीतील हातावर फोटो लॉकेट विकणारे, गंध लावणारे, प्रसाद विकणारे आणि कमिशन एजंट, भिकारी गायब झाले, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या, मंदिर एक नंबर गेटसमोर नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शिर्डीच्या मंदिर परिसरात आणि रस्त्यांवर फक्त भाविकच दिसत होते. रस्ते मोकळे दिसत होते. सायंकाळी मात्र परिस्थिति पूर्वपदावर आली.