Saturday, February 8, 2025
Homeक्राईमShirdi Double Murder: शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी मोठी कारवाई

Shirdi Double Murder: शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी मोठी कारवाई

शिर्डी | प्रतिनिधी
सोमवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ झालेल्या रस्ता लुटीतून डबल मर्डर व एक हाफ मर्डरने साईनगरी हादरली आहे. सोमवारी पहाटे भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचार्‍यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या घराची जागा ही अनधिकृत होती आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली. तसेच, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

- Advertisement -

आणखी कारवाई होणार?
या हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस आणि प्रशासन पुढील चौकशी करत असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या