Wednesday, January 7, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीतील ‘ग्रो मोअर’चा प्रमुख सावळेस पोलीस कोठडी

Shirdi : शिर्डीतील ‘ग्रो मोअर’चा प्रमुख सावळेस पोलीस कोठडी

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणार्‍या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला येथील आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) असे त्याचे नाव आहे. तो नंदुरबार येथील कारागृहात होता. दरम्यान, त्याला राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून त्याला बुधवारी राहाता येथील एम.पी.आय.डी. विशेष न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने 9 दिवसांची (25 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नाशिक, शाहादा (जि. नंदूरबार), शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यासह साथीदारांवर गुन्हे दाखल आहेत. शिर्डी व राहाता येथील दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पैसे दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवून या कंपनीने अनेक सामान्य गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. शितल गोरखनाथ पवार (वय 33, रा. पैजनबाबाचा मळा, राहाता) यांनी 4 जुलै रोजी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भूपेंद्र सावळे याच्यासह भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदीप सावळे, सुबोध सावळे व राजाराम भटू सावळे (सर्व रा. शिर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

शाहादा पोलिसांनी भूपेंद्र सावळे याला अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत नंदूरबार कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भूपेंद्र सावळेला न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी (15 जुलै) सायंकाळी ताब्यात घेतले. त्याला राहाता येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला तपासी अधिकारी सहायक निरीक्षक आठरे यांनी बुधवारी राहाता न्यायालयासमोर हजर केले होते.

भूपेंद्र सावळे याच्या आमिषाला बळी पडून शिर्डी व राहाता परिसरातील अनेक गुंतवणुकदारांची करोडो रूपयांची गुंतवणुक ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स या कंपनीत केली असून भूपेंद्र सावळे याच्याकडून सदरची रक्कम हस्तगत करायची आहे, गुंतवणुकीची रक्कम सावळे याने स्वत:चे फायद्यासाठी वापरली असल्याचा संशय असल्याने त्याचा तपास करायचा आहे, भूपेंद्र सावळे याने ग्रो मोअर कंपनीच्या बँक खात्यातून वेळोवेळी काही संस्थानला मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग केलेल्या आहेत व त्या रोखीने काढल्या आहेत याबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे यासाठी त्याला 10 दिवस पोलीस कोठडी मिळण्याची विनंती निरीक्षक आठरे यांनी केली. न्यायालयाने 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुंतवणूकदारांना आवाहन
भूपेंद्र सावळे याने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शिर्डी व राहाता परिसरातील शेकडो लोकांना ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडले आहे. गुंतवणुकदारांनी आता कोणाच्या आमिषाला बळी न पडता आपल्याकडील कागदपत्रे घेऊन येथील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...