Sunday, September 8, 2024
Homeक्राईमशिर्डी-कोपरगावात चैन स्नॅचिंग करणारे चार आरोपी जेरबंद

शिर्डी-कोपरगावात चैन स्नॅचिंग करणारे चार आरोपी जेरबंद

10 लाखांचा मुद्देमाल जप्त

राहाता |प्रतिनिधी| Rahata

कोपरगांव शिर्डी (Kopargav Shirdi) परिसरात चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करणारे चार सराईत आरोपी पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून 10 लाख रुपये किंमतीचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह मुद्देमाल जप्त केला. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखोच्या (LCB) पथकाने ही कारवाई केली. दिनांक 1 जून 2024 रोजी फिर्यादी गिता गोंविदराज नटराजन (रा. तिरुपती स्ट्रीट, सौकारपेठ, चेन्नई) व त्यांचे पती असे साईबाबा समाधी दर्शनाकरिता पिंपळवाडी रोडने पायी जात असताना समोरुन अनोळखी 2 इसम मोटार सायकलवर येवुन मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील 9 लाख रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व 20 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र ओढून नेले.

- Advertisement -

याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात (Shirdi Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पो. नि. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा समांतर करणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई हेमंत थोरात, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, संदीप पवार, मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, संदिप चव्हाण, अमृत आढाव, अरुण मोरे व महिला अंमलदार भाग्यश्री भिटे यांचे पथक नेमून चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना देत पथकास रवाना केले होते. पथक शिर्डी, राहाता व लोणी (Shirdi Rahata Loni) परिसरात झालेल्या चैन स्नॅचिंग घटना ठिकाणी भेट देवून, घटना ठिकाणचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत हा गुन्हा योगेश सिताराम पाटेकर (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) याने त्याचे साथीदारासह केला आहे.

तो त्याचे साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने (Gold Jewelry) विक्री करण्यासाठी अशोकनगर फाटा येथे येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने पथकाने अशोकनगर फाट्या जवळील रेल्वेच्या पुला जवळ 2 मोटार सायकलजवळ 3 पुरुष व 1 महिला संशयीतरित्या उभे असलेले दिसले. या चारही संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे योगेश सिताराम पाटेकर, राहुल माणिक अमराव (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर), योगेश बाबुराव नागरे (रा. मनोली, ता. श्रीरामपूर) व पद्मा अशोक पिंपळे (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. आरोपींची अंगझडती घेतली असता तुटलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली. आरोपींकडे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व रोख रकमेबाबत अधिक विचारपुस केल्यावर त्यांनी काही दिवसांपुर्वी पिंपळवाडी रोड, शिडी व हॉटेल शितल समोर, येवला रोड, कोपरगांव येथील महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असुन विक्रीकरता आल्याचे सांगितले.

चारही आरोपींचे ताब्यातून 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, साडेतीन रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, 75 हजार रोख व सव्वा लाख रुपये किमतीची यमाहा मोटारसायकल तसेच 1 लाख रुपये किंमतीची विना नंबर होंडा युनिकॉर्न मोटार सायकल असा एकुण 10 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन (Shirdi Police Station) येथे हजर केले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या