Wednesday, September 30, 2026
HomeनगरShirdi News : साईबाबा संस्थानची सामाजिक बांधिलकी; अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस १...

Shirdi News : साईबाबा संस्थानची सामाजिक बांधिलकी; अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी रुपये देण्याचा निर्णय!

शिर्डी (प्रतिनिधी)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर आणि जलप्रलयामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत.

- Advertisement -

अशा बिकट परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी धावून आले आहे. साईबाबांच्या ‘सबका मालिक एक’ या शिकवणुकीला जागून, संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Chief Minister’s Relief Fund) १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरवर्षी शिर्डीला देश-विदेशातून लाखो भाविक भेट देतात. या देणग्या आणि संसाधनांमधून मिळणारा निधी विविध सामाजिक व सेवाभिमुख उपक्रमांसाठी वापरला जातो. याच परंपरेतून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक योगदान देण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.

यामुळे शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांत मराठवाड्यासह नगर, नाशिक अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिक बेघर झाले असून प्रशासनाच्या मदतीसोबत समाजातील विविध घटक देखील पुढे सरसावले आहेत.

ताज्या बातम्या

 Pradeep Purnekar Case : ठाण्यात ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकरांची गोळ्या...

0
ठाणे | Thane येथील मानपाड्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांची काल (मंगळवारी) रात्री गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करुन हत्या...