Monday, July 27, 2026
Homeनगर'ग्रो मोअर' बनावट गुंतवणूक प्रकरण : साईबाबा संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

‘ग्रो मोअर’ बनावट गुंतवणूक प्रकरण : साईबाबा संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

शिर्डी (प्रतिनिधी)

कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूक फसवणूक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, श्री साईबाबा संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘ग्रो मोअर’ या बनावट कंपनीच्या शिर्डीतील गुंतवणूक माध्यमातून सावळे कुटुंबियांनी भूपेंद्रसह राज्यभरातील गुतवणूकदारांना गंडवले होते. या गंभीर प्रकरणात संस्थानच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

राहाता येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात भूपेंद्र, राजाराम सावळे, सुबोध सावळे, संदीप सावळे आणि भाऊसाहेब थोरात यांच्यावर फसवणुकीचा आला गुन्हा दाखल करण्यात होता. अटक करण्यात आलेल्या भूपेंद्रला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर इतर सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.

विशेष म्हणजे, या आरोपींपैकी उर्वरित चौघेही साई संस्थान कर्मचारी असून त्यांनी इतर सहकाऱ्यांनाही या फसवणुकीत गुंतवून संस्थानच्या विश्वासार्हतेला तडे दिले. त्यामुळे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गाडीलकर यांनी तातडीने आणि धाडसी निर्णय घेत या चौघांना सेवेतून निलंबित केले आहे. ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. साईबाबा संस्थानसारख्या पवित्र संस्थेच्या नावावर डाग आणणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई म्हणजे इशाराच सेवाभावी मानला जात असून या प्रकरणात आणखी बळी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रो मोअर कंपनीच्या कोट्यवधी घोटाळ्यात साईबाबा संस्थानचे कर्मचारी आरोपी आहेत. संस्थान कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन बेशिस्तपणाचे व संस्थांच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवणारे असल्याने संस्थान अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊल उचलत त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. मात्र जानेवारी महिन्यात ग्रो मोअरचा संचालक भूपेंद्र पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दीड कोटी रुपये उकळल्याचा आरोप असणाऱ्या पोलिसांवर गुन्हे केव्हा दाखल होणार व त्यांचे निलंबन कधी होणार, असा सवाल आता सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...