Sunday, May 5, 2024
Homeधुळे13 लाखांचा गुटखा पकडला

13 लाखांचा गुटखा पकडला

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

इंदूर येथून धुळ्याकडे जाणार्‍या ट्रकमधून 52 पोते 12 लाख 70 हजार 500 रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ हाडाखेड चेक नाक्यानजीक पकडला.

- Advertisement -

या ठिकाणाहून गुटखासह ट्रक असा 32 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गाने एका ट्रकमधून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस यंंत्रणेला मिळाली. या माहितीच्या आधारे हाडाखेड नाक्यानजीक पथकाने सापळा लावला.

त्यावेळी इंदूरकडून धुळ्याकडे एम.एच.18 बी.जी.1101 हा 12 चाकी ट्रक येतांना आढळून आला. याबाबत ट्रकचालकाकडे चौकशी केली असता त्याने चनादाळ व हार्डवेअर साहित्य इंदूर येथून नेत असल्याची माहिती दिली.

वाहनातील मालाबाबत कागदपत्रांची चौकशी केली असता कोणतीही संयुक्तीक कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यामुळे वाहनाची तपासणी करीत असतांना हार्डवेअर साहित्य व चनादाळ यांच्या पोत्याखाली गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

याठिकाणाहून विमल पानमसाला, तंबाखुजन्य गुटखा व प्रतिबंधित सुगंधीत सुपारी यांचे 52 पोते सुमारे 12 लाख 70 हजार 500 रुपयांची जप्त केली.

पोलिसांनी गुटखा व 20 लाखांचा ट्रक असा 32 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक शाम मोहनलाल मोर्या रा.कनोज आणि सहचालक बलराम मानसिंग बशानिया रा.कनोद या दोघांना अटक केली.

शिरपूर पोलीस ठाण्यात भादंवि 328, 272, 273 सह तंबाखू उत्पादने प्रतिबंधक अधिनियम कलम 7 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई सपोनि अभिषेक पाटील, पोसई दीपक वारे, नरेंद्र खैरनार, पोहेकॉ. लक्ष्मण गवळी, योगेश दाभाडे, योगेश मोरे, गोविंद कोळी यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या