Thursday, May 2, 2024
Homeधुळेशिरपूर तालुका पोलिसांनी गांजा शेती केली उध्दवस्त

शिरपूर तालुका पोलिसांनी गांजा शेती केली उध्दवस्त

धुळे – प्रतिनिधी dhule

शिरपूर (shirpur) तालुक्यातील सांज्यापाडा फत्तेपूर येथे छापा टाकत पोलिसांची (police) गांजा शेती (agriculture) उध्दवस्त केली. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

Video असा कोसळला इंग्रजकालीन पुल

तब्बल 14 लाखांची पाच ते सहा फुटांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तर एकास ताब्यात घेण्यात आले आहे. फत्तेपूर शिवार सांज्यापाडा येथे राहणारा जामसिंग जसमल पावरा याने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी वन शेतात मानवी मेंदूस परिणाम करणार्‍या प्रतिबंधीत गांज्या अंमली पदार्थ वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनिय माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली.

Video असा कोसळला इंग्रजकालीन पुल

याबाबत त्यांनी पोलीस अधिक्षकांना माहिती दिली. त्यांच्या आदेशाने प्रादेशीक परिवहन अधिकारी सुनिल पाटील यांना सोबत घेत काल दुपारी त्या शेतात छापा टाकला. शेतात काही पिकांच्या आड गांजाची 5 ते 6 फुटांची झाडे दिसून आली.

ती मुळासकट उपटून एकुण 14 लाख 46 हजार 600 रुपये किंमतीचे एकूण 482 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे जप्त करण्यात आली. तसेच जामसिंग पावरा यालाही ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात शिरपूर तालूका पोलिसात एनडीपीएस कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोसई संदीप पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव व उपविभागिय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गर्शनाखाली सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई. संदीप पाटील, भिकाजी पाटील, असई के.एस.जाधव, पोहेकॉ संजय सुर्यवंशी, चतरसिंग खसावद,पवन गवळी, जगदीश मोरे, पोना प्रविण धनगर, संदीप ठाकरे,अरिफ पठाण, संदीप शिंदे, भुषण चौधरी, अनिल शिरसाठ, मोहन पाटील, पोकॉ जयेश मोरे, योगेश मोरे, प्रकाश भिल, रोहिदास पावरा, कृष्णा पावरा, संतोष पाटील, इसरार फारुकी व आरसीपी पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या