Friday, May 3, 2024
Homeधुळेजलयुक्त शिवारच्या डॅममध्ये बुडून युवकाचा मृत्यू

जलयुक्त शिवारच्या डॅममध्ये बुडून युवकाचा मृत्यू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील हेंद्रयापाडा शिवारातील जलयुक्त शिवारच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत शिरपूर तालुका पोलिसात नोंद झाली आहे.

- Advertisement -

गणपत रामचंद्र पावरा (वय 17 रा. हेंद्रयापाडा ता. शिरपूर) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो दि. 12 सप्टेंबर रोजी 11 वाजेच्याा सुमारास जलयुक्त शिवारातील पाण्याच्या डॅममध्ये आंघोळीसाठी गेला होता. पाय घसल्याने तो पाण्यात पडला.

याबाबत गावात कळाल्यानंतर त्याचा पाण्यात शोध सुरू केला. दुसर्‍या दिवशी दि. 13 रोजी सायंकाळी त्याचा पाण्यात मृतदेह आढळून आला. याबाबत शिरपूर तालुका पोलिसात नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या