Monday, May 20, 2024
Homeधुळेशिवसेनेने अधीक्षक अभियंत्यांना दिले चक्क ‘बेशरम’चे झाड...

शिवसेनेने अधीक्षक अभियंत्यांना दिले चक्क ‘बेशरम’चे झाड…

धुळे Dhule। प्रतिनिधी

भूमिगत गटार (Underground sewers) योजनेच्या नावाने देवपूर भागातील रस्ते (Roads) दोन वर्षांपासून खोदून ठेवले (Dug up) आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. बांधकाम विभागाच्या (Construction Department) अंतर्गत येणार्‍या देवपूरातील आग्रारोडवरही नवरंग टाकी ते दत्तमंदिर पर्यतचा रस्ता संबंधित ठेकेदाराने (contractor) खोदून ठेवला आहे. मात्र, सार्वजनिक विभागाने संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच रस्ता दुरुस्तीही केलेला नाही. या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे होत असलेले दुर्लक्ष पाहता भूमिगत योजनेचा ठेकेदार हा बांधकाम विभागाचा जावाई (Javai of the construction department) आहे का? असा सवाल उपस्थित करून शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकार्‍यांनी अधीक्षक अभियंत्यांना (Superintendent of Engineers) बेशरमचे झाड (tree of ‘Shameless) देवून निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

याबाबत शिवसेनेने अधीक्षक अभियंत्यांना (Superintendent of Engineers) निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, भूमिगत योजनेच्या कामासाठी देवपूर भागातील रस्ते दोन वर्षांपासून खोदून ठेवले आहेत. नागरिक यातना भोगत आहेत. गेल्या वर्षी देवपूरचे नाव खड्डेपुर करावे अशी मागणी मनपा आयुक्तांकडे (Municipal Commissioner) केली होती. परंतु, महापालिकेचे सत्ताधारी व प्रशासनाच्या कारभारामुळे भूमिगत (Underground sewers) योजनेचे काम अतिशय निष्कृष्ट होत आहे. ही योजना शंभर टक्के अयशस्वी ठरणार आहे.

परंतु, या योजनेशी काहीही संबंध नसलेला सार्वजनिक बांधकाम विभागाची (Construction Department) भूमिकाही संशयास्पद दिसत आहे. कारण या विभागाच्या अखत्यारित येणारा नवरंग टाकी ते दत्त मंदिरपर्यत प्रमुख रस्ता देखील भूमिगत योजनेच्या नावाने खोदून ठेवलेला आहे. यासंदर्भात शिवसेनेने (Shiv Sena) अनेक आंदोलने केली. त्यानंतर रस्त्याची तात्पुरता डागडूजी करण्यात आली. परंतु, हा रस्ता अतिशय रहदारीचा असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग एकाद्याचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? रस्ता दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे.

परंतु, बांधकाम विभागही याकडे दुर्लक्ष करीत आहे. बांधकाम विभागही या योजनेचा लाभार्थी आहे? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन पावसाळ्यापुर्वी हा रस्ता वाहतूकीसाठी खुला (Road open to traffic) करावा. अन्यथा बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना कार्यालयात बसणेही मुश्किल होईल, अशा स्वरुपाचे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, महानगरप्रमुख मनोज मोरे, सतिष महाले, धीरज पाटील, डॉ.सुशील महाजन, सौ.हेमाताई हेमाडे, संजय वाल्हे, राजेश पटवारी, नितीन शिरसाठ, दिनेश पाटील, शरद गोसावी, पवन शिंदे, भाऊसाहेब हिरे, संदीप चौधरी, रवींद्र बिलाडे, सुनिल चौधरी, पंकज चौधरी, रफिक पठाण, देविदास लोणारी, ललित माळी, मच्छिंद्र निकम, डॉ.जयश्री वानखेडे, प्रवीण साळवे, छोटू माळी, सुरेश मोरे, कैलास मराठे, मुरलीधर जाधव, संजय जगताप, विनोद जगताप, भटू गवळी, शेखर बडगुजर, निलेश मराठे, पंकज चौधरी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या