Friday, May 3, 2024
Homeनाशिकशिवसेनेकडून असंघटित कामगारांची ई- श्रम कार्ड नोंदणी

शिवसेनेकडून असंघटित कामगारांची ई- श्रम कार्ड नोंदणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

मुसळगाव औद्योगिक वसाहत (Musalgaon Industrial Estate) परिसरात असंघटित कामगारांची ई-श्रम कार्डची (E-labor card) नोंदणी अभियान (Registration campaign) राबवण्यात आले. यावेळी कामगारांना कार्डचे वितरण (Card distribution) करण्यात आले.

- Advertisement -

नगरसेवक श्रीकांत जाधव (Corporator Shrikant Jadhav) यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात प्रामुख्याने बांधकाम कामगार (Construction workers), स्वयंसहायता गटाचे सभासद, आशा सेविका (Asha Sevika), अंगणवाडी सेवक (Anganwadi worker), टपरीधारक, हॉकर्स (Hawkers), रिक्षाचालक, फळ व भाजीपाला विक्रेते, वीट भट्टी कामगार, वृत्तपत्र विक्रेते, शेतमजूर, गरिब शेतकरी, हॉटेल कामगार, विविध दुकानातील असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यात आली.

नोंदणी केलेल्या कामगारांना दोन लाखांचा अपघाती विमा लागू होणार आहे. तसेच वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारच्या (Central and State Governments) वतीने जाहिर करण्यात येणार्‍या सामाजिक सुरक्षाही लागू होणार आहेत. यावेळी नगर परिषदेतील शिवसेनेचे (shiv sena) गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक विजय जाधव, डॉ. महाविर खिवंसरा, दिपक आनप, विभागप्रमुख विष्णू साबळे यांच्या हस्ते कामगारांना कार्डचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी गणेश नगर हौसिंग सोसायटीचे चेअरमन मंगेश परदेशी, रवि पठाडे, भिमा सांगळे, सुनिल वाळेकर, लक्ष्मण डापसे, मनिष बहारे, अंजना बोरसे, उमेश हारक, बाबासाहेब लहासे यांनी परिश्रम घेतले.

कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी देशभरातील असंघटीत कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यातून अनेक लाभ या कामगारांना मिळू शकतात. तालुक्यातील सर्व असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी करावी व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. नोंदणी होताच कामगार 2 लाखांच्या अपघाती विम्यास पात्र होतात.

श्रीकांत जाधव, नगरसेवक

- Advertisment -

ताज्या बातम्या