Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजShivsena UBT: शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकांसाठी कंबर कसली; ४० स्टार प्रचारकांची यादी...

Shivsena UBT: शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकांसाठी कंबर कसली; ४० स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर, कोणा कोणाचा आहे समावेश?

मुंबई | Mumbai
येत्या काही दिवसांत राज्यात महानगर पालिका, जिल्हापरिषदांचा निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून ४० स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवे यांचा या यादीत समावेश आहे.

- Advertisement -

यासोबतच शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, राजकुमार बाफना, खासदार प्रियांका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, जयश्री शेळके, जान्हवी सावंत, शरद कोळी, वैभव नाईक, आनंद दुबे, किरण माने, अशोक तिवारी, प्रियांका जोशी, सचिन साठे, लक्ष्मण वडले यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : १ मे २०२६ – पुरोगामी प्रतिमा जपण्याचे आव्हान

0
महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा सहासष्टावा वर्धापनदिन अन्य काही दिनांप्रमाणे केवळ साजरा करण्यात मराठीजनांनी धन्यता मानली तर सध्याच्या स्थितीत ती एक मोठीच आत्मवंचना ठरेल, असे म्हटले तर...