Friday, May 3, 2024
Homeनगरपाथर्डीत शिवसेनेचे केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन

पाथर्डीत शिवसेनेचे केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) –

शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, इंधन दर वाढ कमी करण्यात यावी, रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांची माफी मागावी या मागणीसाठी

- Advertisement -

पाथर्डी तालुका शिवसेनेकडून शहरातील वसंतराव नाईक चौकात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आले.

धरणे आंदोलनात शिवसेनेचे शेवगाव-पाथर्डी विधानसभा संघटक भगवान दराडे, शिवसेना तालुकाध्यक्ष अंकुश चितळे, शहराध्यक्ष सागर राठोड, बंडू ससे, भीमसेन अकोलकर, घनशाम घोडके, सुनील पालवे, लखन शिंदे, दत्ता दराडे, दादासाहेब फुंदे, अमोल मरकड, सोहेल पठाण, दादा पारखे, नवनाथ वाघ, अमोल जायभाय आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी भगवान दराडे म्हणाले, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील शिवसैनिक धरणे आंदोलन करत आहेत.गेली सहा वर्षात शेतकर्‍यांना या मोदी सरकारने ठोस असे काहीच केले नाही. आता शेतकर्‍यांच्या विरोधात जाऊन कायदा पारित केला. इंधन दरवाढ दररोज वाढत चालली आहे. सर्वसामान्य माणसाला करोना काळात जगने मुश्किल झाले असताना चुकीच्या धोरणामुळे अनेक गोष्टींवर परिणाम जाणवायला लागले आहे. सत्तेत राहून हुकूमशाहीपणाने वागणे केंद्रातील मंत्री मंडळी करत असून यांचे खा. रावसाहेब दानवे हे शेतकर्‍यांविषयीचे चुकीचे वक्तव्य करून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करतात. येणार्‍या काळात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही ही दराडे यांनी यावेळी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या