Wednesday, February 4, 2026
HomeनगरRahata : पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीतही महादेवाचे दर्शन

Rahata : पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीतही महादेवाचे दर्शन

आज सकाळी कथेची सांगता

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पंढरीचा विठ्ठल ही एकमेव देवता आहे, ज्यांच्या डोक्यावर शिवलिंग आहे. पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यास शिवही प्रसन्न होतात. विठ्ठलाच्या भक्तीतही महादेवाचे दर्शन घडते, असे प्रतिपादन पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले. अस्तगाव पिंप्री निर्मळ शिवेवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन केले गेले. बुधवारच्या कथेला कथेचे तीनही पेंडोल भाविकांनी फुलून गेले होते; याशिवाय पेंडोलच्या बाहेर भाविकांनी कथा श्रवणासाठी गर्दी केली होती. प्रचंड गर्दी असूनही शांततेत कथा श्रवणाचा आनंद चौथ्या दिवशी शिवभक्तांनी घेतला. आज सकाळी या कथची सांगता होणार आहे.

- Advertisement -

पंडित मिश्रा महाराज यांनी पांडुरंगाचा उल्लेख करून सांगितले, आषाढी वारीला लाखो भाविक वारीच्या माध्यमातून पंढरपूरला जातात. भगवान शंकरांनी सुध्दा पार्वतीला घेऊन पंढरीची वारी केली. कैलास पर्वतावरून काशी आणि पंढरी अशी त्यांनी यात्रा केली. भाविकांच्या गर्दीत पांडुरंगानेच भगवान शंकरांना आपल्या डोक्यावर बसवून नेले, असा पौराणिक दाखला देत आजही विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग विराजमान असल्याचे त्यांनी सांगितले.

YouTube video player

स्वच्छ शरीराप्रमाणे मनाची शुद्धताही ठेवावी लागेल. आत्म्याची पवित्रता राखली गेली तर मनाची पवित्रता वाढेल. मनाची पवित्रता शिवनामाने वाढते. पवित्रतेमुळेच भगवान शंकराची शरणागती होऊ शकते. शिवपुराण कथा ऐकून मन स्वच्छ होईल. पर्वतातून नदीचा उगम होतो. पर्वताला सोडून नदी वाहून जाते. याचे कारण पर्वत कठोर आहे. एखादी व्यक्ती कठोर असेल तर इतर जण त्याच्या पासून दूर जातात. शिवपुराण कथा लोकांशी चांगले नाते निर्माण करायला शिकवते. मौखिक व लेखी परीक्षेचे उदाहरण देत पंडित मिश्रा म्हणाले, हत्तीचा आवाज ऐकून शिव येतात. मुंगीने आवाज दिला तरी भगवान येतात. ही मौखिक परीक्षा असते. प्रेमाने बोलवा, देव प्रेमाने जवळ येतो. महादेवांना प्राप्त करायचे असेल तर मौखिक परीक्षेत उतरावे लागेल. शिवाचा जप सातत्याने करावा लागेल.

पवित्र नगरी शिर्डीमध्ये यापूर्वीही अनेक मोठ्या कथा झाल्या आहेत. वेळ घालविण्यासाठी जाऊ नका, शिवपुराण कथा ही कथा समजू नका, शुद्ध मनाने ऐका. भगवान शंकराशी मनाचा संवाद साधणारी ही एक सेवा आहे. आयुष्यात सर्वात विचित्र दान हे कन्यादान आहे. वडील आपले सर्व सुख मुलीच्या रूपाने दान करतात, त्याची किंमत समोरच्याला किती समजतात हे माहीत नाही. पण वडिलांचे दुख हे फक्त मुलीच समजू शकतात, हे उदाहरण देऊन पंडित मिश्रा म्हणाले, संसारात सर्वांना बरोबर घेऊन चला. कार्तिक महिन्याच्या या शिवपुराणाला खूप पवित्र असे ठरले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

सलग चार दिवस शिवपुराण कथेला भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सुयोग्य नियोजनामुळे भाविकांना कुठेही अडचण होऊ नये, अशी व्यवस्था जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. चौथ्या दिवशी गर्दीचा उच्चांक मोडल्यामुळे आहे तिथेच बसण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व स्वयंसेवक भाविकांना नियोजनात सक्रियपणे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar: “त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे?” विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी...

0
बारामती | Baramatiराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वेगवेगळ दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत दिवंगत अजितदादा पवार...