Thursday, May 2, 2024
Homeनगरमराठा सेवा प्रतिष्ठानची शिवजयंती; 103 शिवप्रेमींनी केले रक्तदान

मराठा सेवा प्रतिष्ठानची शिवजयंती; 103 शिवप्रेमींनी केले रक्तदान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मराठा समाज सेवा प्रतिष्ठानच्या शिवजयंती महोत्सव समितीस कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शिवजयंती मिरवणूकीस यावर्षी परवानगी मिळाली नाही.

- Advertisement -

त्यामुळे समितीच्या वतीने 103 शिवप्रेमींनी रक्तदान करुन आणि 254 व्यक्तींनी रक्तगट, शुगर तपासणी करुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली.

मराठा समाज प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त दरवर्षी पारंपारीक वाद्यासह शिस्तबद्ध भव्य मिरवणूक श्रीरामपूर शहरातून काढण्यात येते; परंतू करोनामुळे शासनाने मिरवणूकीस परवानगी नाकारल्याने सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

त्यानिमित्ताने थत्ते मैदान जवळील शिवबा हॉल येथे रक्तदान, रक्तगट व शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व आरती दादा बोंबले व सौ.भगिरथी बोंबले आणि विजयराव आसने व सौ.केशरबाई आसने या ज्येष्ठ दांपत्यांच्या हस्ते करण्यात आली.

नित्यसेवा ब्लड बँकेचे डॉ. राजाराम व सौ.अनुराधा जोंधळे यांनी 103 रक्तदात्यांचे रक्त संकलन केले. यावेळी संदीप शाह यांनी 90 वी, तर राहुल उंडे यांची 75 वी रक्तदान करण्याची वेळ होती. तसेच यावेळी जि.प.सदस्य शरद नवले, माजी नगरसेवक बाबासाहेब खोसरे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विलासराव जाधव, उपाध्यक्ष किशोर निर्मळ, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षा सौ.सिमा जाधव, सचिव रावसाहेब तोडमल यांच्यासह मराठा युवा ग्रुपच्या सदस्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर श्री स्वागत क्लिनिक लॅबचे लक्ष्मीकांत शिंदे, योगेश मरकड, योगेश कानडे यांनी 254 व्यक्तींची रक्तगट व शुगर तपासणी केली.

याप्रसंगी आ.लहू कानडे, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पं.स.सभापती सौ.संगिता शिंदे, इंद्रनाथ थोरात, सचिन गुजर, बाबासाहेब कोळसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश राठी, शहर प्रमुख मारुती बिंगले, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले, नगरसेवक मनोज लबडे, सौ. भारती कांबळे, सुधीर नवले, यादवराव लबडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, योगप्रशिक्षक अनिल कुलकर्णी, डॉ. महेश क्षीरसागर, रितेश रोटे, लकी सेठी, सौ.अर्चना पानसरे आदींनी भेट देवून अभिवादन केले. या शिवजयंती निमित्तानेे वैभव जैत, स्वप्निल लांडे, बाळासाहेब ढोरंगे, बाबासाहेब मोरगे, अमोल बोंबले, तुषार पवार, अविनाश पटारे यांनी अल्पोपहार, चहा, सॅनिटाझर, मास्क, पाणी व मंडपची विनामूल्य सेवा उपलब्ध करुन दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या