Thursday, May 2, 2024
Homeनाशिककिल्ल्यांचे सौंदर्य अबाधित राहणार का?

किल्ल्यांचे सौंदर्य अबाधित राहणार का?

गिरणारे | Girnare

लॉकनंतर शिवकार्य गडकोट ची दुर्ग संवर्धन मोहीम रामशेज किल्ल्यावर यशस्वी पार पडली.

- Advertisement -

नेहमीप्रमाणे यावेळी प्लास्टिकचा खच, इतर कचरा, किल्ल्यावरील दगड अस्ताव्यस्त तसेच मद्याच्या बाटल्या दिसून आल्या. दर मोहिमेच्या वेळी असेच दलचित्र दिसत असल्याने यावर चाप बसणार का? प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची १२१ वी अखंड दुर्गसंवर्धन मोहीम अजिंक्य दुर्ग रामशेजवर (दि.१०) रोजी झाली. भल्या पहाटे सुरू झालेल्या या मोहिमेत रामशेजच्या माथ्यावरील निखळलेल्या धोकेदायक मार्गाची दुरुस्ती, ऐतिहासिक चुन्याचा घाना कचरामुक्त, गोमुखी दरवाजातील अस्ताव्यस्त दगडे, माती, गाळ इत्यादी कचरा काढण्यात आला.

तर किल्ल्यावरील संवर्धन केलेल्या वास्तूंची करोना काळात उपद्रवीकडून झालेली हेळसांड बघून दुर्ग संवर्धकांनी संताप व्यक्त केला. वनविभाग व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रामशेज किल्ल्याची होणारी वाताहत याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

रामशेजकडे वन विभाग व स्थानिकांचे दुर्लक्ष असल्याने किल्ल्यावर प्लास्टिकचा खच, दगड अस्ताव्यस्त दिसून येतात. त्यामुळे नेहमीच दुर्ग मोहिमेच्या माध्यमातून हा कचरा गोळा करत असतो. परंतु यावर चाप कधी बसणार? प्रशासन याकडे कधी लक्ष देणार ?

-तुषार पिंगळे, दुर्गसंवर्धक

- Advertisment -

ताज्या बातम्या