Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र‘राजे’चा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा हुकला

‘राजे’चा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा हुकला

नेवासा बुद्रुक (वार्ताहर) – नेवासा येथील प्रगतशील शेतकरी नानासाहेब शेंडे यांच्या घरी पाळलेल्या अश्‍वाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहुब प्रतिमा आहे. त्यामुळे हा अश्‍व शिव भक्तांसाठी श्रद्धेसह अस्मितेचा विषय आहे. या अश्‍वाच्या मालकांनाही याचा अभिमान आहे. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी या अश्‍वाला घेवून त्याचे मालक दरवर्षी जात असतात. मात्र यंदा करोनामुळे अश्‍वाला घेवून जाण्याची सोय करता न आल्याने त्यांची रायगडवारी चुकल्याची खंत त्यांनी साश्रू नयनांनी व्यक्त केली.

काही वर्षांपूर्वी शेंडे यांनी एक अश्‍वाची मादी आणली होती. तिच्या वेतातून हा नर अश्‍व जन्माला आला. त्यांनी त्यांचे पालन पोषन केले लहानपणी या अश्‍वाच्या पाठीवर व मांडीवर शिवप्रतिमा असल्याचे जाणवू लागले. जसजसा अश्‍व मोठा होत गेला तशी शिव प्रतिमा खूपच उठावदार आणि स्पष्ट दिसू लागली. मालक देखील आश्‍चर्य चकित झाले आणि नंतर सदरील आश्‍वाला घोडा न म्हणता ‘राजे’ या नावाने संबोधू लागले. दरवर्षी त्याला शिवराज्याभिषेक सोहळ्याला घेवून जावू लागले.

- Advertisement -

यंदाचा सोहळा हुकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी जगातील सर्वात मोठी संपत्ती असणारा माणूस असल्याचे स्वतःला समजतो. ‘राजे’ मुळं संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली मी व माझे कुटुंब खूप नशीबवान असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या