Friday, May 3, 2024
Homeनगरनगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत

नगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर डीजे लावून काढलेल्या मिरवणुकीची चर्चा थेट मुंबईत पोहोचली आहे. डीजे लावून काढलेल्या या मिरवणुकीने जिल्हाधिकार्‍याच्या आदेशाचा भंग केला असल्याने ही मिरवणूक काढणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगरच्या शिवराष्ट्र सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केली असून, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे त्या मिरवणुकीचीव या आंदोलनाची चर्चा मुंबईतही सुरू झाली आहे.

- Advertisement -

शिवराष्ट्र सेनेचे मुंबईतीस आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू असून, नगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावून वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी बेकायदेशीर जमाव जमून डीजे सिस्टीम लावून मिरवणूक काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचेउल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

डीजे लावून जल्लोष करणार्‍या विजयी उमेदवारांवर व डीजे मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. तसेच संबंधित कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीचे निवेदन नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले असून अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबईत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या