Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक?

शिंदे गटाकडून शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक?

मुंबई | Mumbai

दहीहंडी उत्सावाच्या वेळी वरळीचं जांबोरी मैदान (Worli Jamboree Ground) पटकावून भाजपने (BJP) शिवसेनेवर (ShivSena) कुरघोडी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता दसरा मेळाव्याच्यावेळी (Dussehra Rally)होण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कात होतो. यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडित होण्याची शक्यता असून शिवसेनेतून बंडखोरी केलेला एकनाथ शिंदेंचा गट शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने याअगोदरच दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. मात्र, मुंबई महापालिकेने (Mumbai NMC) यासाठी आखडता हात घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेला पालिकेने मैदानासाठीची परवानगी नाकारताच शिंदे गटाकडून (Shinde Group) हे मैदान मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park) मिळावे म्हणून शिंदे गटही सक्रिय झाला आहे. दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे शिंदे गट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच शिंदे गट निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत.

तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. मात्र, शिंदे गटही शिवाजी पार्क मैदानासाठी सक्रिय झाल्याने हे मैदान कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या