Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत? संजय राऊतांचा खासदार संजय...

Sanjay Raut: बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत? संजय राऊतांचा खासदार संजय जाधवांवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मेळावा रद्द करण्याच्या इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाचे नेतृत्व करतात. ते प्राण पणाला लावून लढत आहेत. सतत उपोषण करून त्यांची प्रकृती खूप खालावली आहे, हे मी स्वतः पाहिले आहे. मध्यंतरी त्यांचा चिरंजीव हॉस्पिटलमध्ये होता, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सांगितले होते की, सारखे आंदोलन, उपोषण करून आपल्या प्रकृतीची वाट लावू नका. मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यात उपोषणाला बसलेले असताना आणि वातावरण तप्त असताना परभणीच्या खासदारांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलावून जो मेळावा घेतला, तो टाळावा अशी जरांगे पाटलांची भूमिका होती. समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात त्यांची ती भूमिका होती. त्यांची तळमळ, तडफड मी सुद्धा काल पाहिली.

- Advertisement -

बंडू, झंडू, फंडू कोण आहेत
“खासदार संजय बंडू जाधव यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी जरांगे पाटलांची फार मोठी मदत झाली, हे सत्य आहे. त्यांनी जर ती अपेक्षा केली असेल, तर त्यांनी तो त्याग करायला पाहजे होता. पण बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष ठाकरेंकडे सत्ता भोगल्यानंतर ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, सर्व पदं भोगली. ते आता आमच्या मनोजदादा जरांगेंचे कसे होतील? ते नवनवीन आई-बाप शोधत असतात. जो माणूस ठाकरेंचा होऊ शकत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना धडा शिकवण्याची भूमिका घेतलेली आहे. मला त्यांचा स्वभाव माहिती आहे, ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. धडा आम्ही देखील शिकवू. जे सगळे गद्दार गेले आहेत ते पुन्हा संसदेत जाणार नाहीत, याची व्यवस्था शिवसैनिकांनी केलेली आहे,” असे त्यांनी म्हटले.

संपादकीय : ३१ ऑगस्ट २०२६ – अमेरिकन स्वप्न संकटात

आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री कुंपणावर बसून
“आरक्षण विषयावर मुख्यमंत्री कुंपणावर बसून आहेत. त्यांनी कधीही मार्ग काढलेला नाही. उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही चर्चा करू, ते ज्युनियर मंत्री पाठवतात चर्चा करायला. बाकी सगळ्या गोष्टीत तुमचे गांभीर्य आहे, पण मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष दिले पाहिजे. पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला आरक्षण देणार होते, काय झाले त्याचे? ते वाद घडवतात. निवडणूक आली की आश्वासन देतात आणि पुन्हा विसरतात,” अशी टीका देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकार बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नाव्हेेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून 3 नाव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रारूप निवडणूक...