Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांना कोर्टाचे समन्स

संजय राऊतांना कोर्टाचे समन्स

मुबंई | Mumbai

शिवसेनेचे (Shivsena) (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना प्रक्षोभक भाषणा (Provocative Speech) प्रकरणी बेळगाव कोर्टाने ( Belgaum Court) समन्स बजावले असून त्यांना १ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत…

- Advertisement -

संजय राऊत हे गोरेगाव (Goregaon) येथील कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर (Bail) सुटका झाली आहे. त्यानंतर आता राऊत यांना ३० मार्च २०१८ रोजी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची (Arrested) टांगती तलवार आहे.

दरम्यान, नोटीस बजावल्यानंतर संजय राऊत हे स्वतः १ तारखेला कोर्टात हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही दिवसांपूवी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra-Karnataka border Isshu) बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी टीका करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना कोर्टाचे समन्स आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या