Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यादसरा मेळावा शिवतीर्थावरच! शिवसेनेची उच्च न्यायालयात धाव

दसरा मेळावा शिवतीर्थावरच! शिवसेनेची उच्च न्यायालयात धाव

मुंबई | Mumbai

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dussehra gathering) कुणाचा? हा प्रश्न अनुत्तरीत असतांना शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. तसेच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर निर्णय देण्याची मागणी केली आहे…

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आम्हाला परवानगी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमच्या अर्जावर मुंबई महानगरपालिकेला तातडीने निर्णय देण्याचे आदेश द्या, तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. तर न्यायालयानेही याचिकेवर तातडीने सुनावणी गरजेची असल्याचे सांगून प्रकरणावर उद्या सुनावणी ठेवली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाने वकील जोएल कार्लोस (Lawyer Joel Carlos) यांच्या वतीने ही याचिका केली असून न्यायमूर्ती रमेश धनुका (Justice Ramesh Dhanuka) आणि न्यायमूर्ती कमल खाता (Justice Kamal Khata) यांच्या खंडपीठासमोर आज ही याचिका सादर करण्यात आली आहे. तसेच मुंबई महानगरमहापालिका, महानगरपालिका आयुक्त आणि जी-उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या