Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAmbadas Danve: तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे, आया बहिणींचे…; अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांवर जळजळीत...

Ambadas Danve: तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे, आया बहिणींचे…; अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांवर जळजळीत टीका

छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर पेनने सुसाईड नोट लिहिली होती. यात त्यांनी आत्महत्येचे कारण नमूद केले होते. फलटण पोलीस ठाण्याचे पीएसआय गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर हे आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी आता सर्वच स्तरावर होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

अंबादास दानवेंची पोस्ट
अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घ्या फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृहखात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा दोन महिन्यांनी केलेला अर्ज. याची उत्तरे द्यावी लागतील आपल्याला देवाभाऊ!

  1. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या तक्रार अर्जावर महिने-महिने कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार?
  2. ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला एका डॉक्टरचा बळी आहे, हे आपण मान्य करता काय?
  3. महिला डॉक्टचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते दोन पीए कोण?
  4. हे खासदार महोदय नेमके कोण?
  5. या महिला डॉक्टरला बीड वरून हिणवणारे पीआय महाडिक कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली?
  6. ‘पारदर्शक’ आणि ‘गतिमान’ शासन म्हणता, मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज दोन महिने का निकाली निघाला नाही?
  7. चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतात स्ट्रॉबेरी लावत होते?
  8. या डॉक्टरने आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली?
- Advertisement -

आज लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे. फडणवीस जी, तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे, आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात. राजीनामा द्या, असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...