Friday, May 3, 2024
Homeनगरशिवसैनिकांनी कंगनाच्या पोस्टरला मारले जोडे

शिवसैनिकांनी कंगनाच्या पोस्टरला मारले जोडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने

- Advertisement -

राज्यातील जनतेच्या भावना दुखविल्याच्या निषेधार्थ नगर येथे शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे तिच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून दहन करण्यात आले.

याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हा उपप्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक योगिराज गाडे, अमोल येवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, बाबू कावरे, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, अक्षय कातोरे, विशाल गायकवाड आदींसह शिवसैनिक उपस्थित होेते.

याप्रसंगी सातपुते म्हणाले, ज्या महाराष्ट्रात राहतो, त्या राज्याच्या विरोधात भूमिका म्हणजे एकप्रकारे देशद्रोहच आहे. महाराष्ट्राने नाव दिले, पैसे दिले तरीही तेथील पोलीस, मुख्यमंत्री यांच्यावतीने बेताल वक्तव्य करून एकप्रकारे महाराष्ट्र जनतेचा अपमान केला आहे.

त्यामुळे अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, कंगनाच्या वक्तव्यांचा आम्ही शिवसैनिक तिव्र निषेध करतो व तातडीने कंगणावर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे. ते म्हणाले कि यापुढे नगर जिल्ह्यात तिचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला.

याप्रसंगी बोराटे यांनी कंगना हीने नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, अशा व्यक्तीला महाराष्ट्रात स्थान नाही, हे पार्सल परत पाठवून दिले पाहिजे. तिच्या सर्व कार्यक्रम व चित्रपटांवर बहिष्कार घालावा, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी कंगना यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व वादग्रस्त वक्तव्यांबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

कंगना विरोधात कारवाई करा, शिवसेनेची पोलिसांकडे मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरून टीका केली. त्याविरोधात शिवसैनिकांमध्ये राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

तिच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, म्हणून शहर शिवसेनेच्यावतीने बुधवारी रात्री उशिरा माजी शहर प्रमुख संभाजी कदम व सेना नगरसेवक व पदाधिकारी यांनी कोतवाली पोलिसांना निवेदन दिले.

यावेळी नगरसेवक संजय शेडगे, गणेश कवडे, शाम नळकांडे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, योगीराज गाडे, सचिन शिंदे, बबलू शिंदे, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोद्रे, कॅन्टोन्मेंट सदस्य रवींद्र लालबोंद्रे, केडगावचे रमेश परतानी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख सुषमा पडोळे, शहर प्रमुख अरुणा गोयल आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या