मुंबई | Mumbai
चित्रपसृष्टीत आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सुशांत सिंह, मराठी अभिनेता आशुतोष भाकरे, समीर शर्मा नंतर आता प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकनंही आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुपमाने आपल्या दहिसर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे तब्बल चार दिवसानंतर उघड झाले आहे. अनुपमाने आत्महत्या करण्याआधी फेसबुक लाईव्ह करून चाहत्यांशी संवाद ही साधला होता. या लाईव्हमध्ये अनुपमानं आपल्याला नक्की कशाचा त्रास होतोय, याचीही माहिती दिली होती.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये तिने लिहले आहे, “मैत्रीणीने दिलेल्या सल्ल्यानुसार मी एका कंपनीत १० हजारांची गुंतवणुक केली होती. कंपनी माझे पैसे व्याजासकट मागील वर्षीच डिसेंबरमध्ये देणार होती. मात्र, आता ती कंपनी माझे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच एका व्यक्तीने लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर माझी दुचाकी गाडी घेतली होती. तेव्हा मी माझ्या मुळ गावी होती. जेव्हा मी परत आले तेव्हा त्यानं माझी दुचाकी देण्यास नकार दिला आहे.” अनुपमाच्या आत्महत्येच्या टोकाच्या निणर्यानं तीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.