Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधक्कादायक : कौटुंबिक वाद विकोपाला; सुनेकडून सासूची हत्या

धक्कादायक : कौटुंबिक वाद विकोपाला; सुनेकडून सासूची हत्या

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका ६० वर्षीय सुनेने आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध सासूचा चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असून, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही थरारक घटना मंगळवारी, १२ मे रोजी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील समृद्धी रेसिडेन्सीमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सुमन शिंदे (वय ८० वर्षे) असून, आरोपी सुनेचे नाव अनुपमा संजय शिंदे (वय ६०) आहे. या दोघींमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून वाद सुरू होते. मंगळवारी दुपारी सासू-सुनेमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले.

हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात आरोपी अनुपमा शिंदे यांनी घरात असलेल्या आपल्या स्वतःच्या सासूला एका बेडरूममध्ये ढकलले आणि बाहेरून दरवाजाची कडी लावून घेतली. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघरातील धारदार चाकू आणून सासू सुमन शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपीने सासूच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने सपासप वार केले. अत्यंत गंभीर जखमी झाल्यामुळे सुमन शिंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी आरोपी अनुपमा शिंदे यांना तात्काळ ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सरळ आणि कमी अंतराच्या मार्गानेच व्हावा...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ २३६ किमी महारेल अलाइनमेंटला अंतिम मंजुरी देऊन हा प्रकल्प सरळ आणि कमी अंतराच्या मार्गानेच साकारण्यात...