Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजजम्मु-काश्मिरच्या शोपियानमधून लष्कर-ए-तैयबाचे 'हायब्रीड दहशतवादी' सुरक्षा दलांना शरण; कोण आहेत हे दहशतवादी?

जम्मु-काश्मिरच्या शोपियानमधून लष्कर-ए-तैयबाचे ‘हायब्रीड दहशतवादी’ सुरक्षा दलांना शरण; कोण आहेत हे दहशतवादी?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आता काश्मीर खोऱ्यातील सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केले आहे. या दरम्यान सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळत आहे. बुधवारी रात्री एका सर्च ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलाने शोपियानमधून दोन हायब्रिड दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आता काश्मीर खोऱ्यातील सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केले आहे. या दरम्यान सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळत आहे. बुधवारी रात्री एका सर्च ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलाने शोपियानमधून दोन हायब्रिड दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.

आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांची नावे इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी आहेत. दोघेही लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंधित होते आणि ते हायब्रिड दहशतवादी म्हणून काम करायचे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी बुधवारी रात्री शोपियानच्या बस्कुचन भागात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याचा सुगावा पोलिसांना माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी या परिसराला चारही बाजूंनी वेढा दिला आणि पोलिसांची कुमक पाहून दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

YouTube video player

कोण असतात हायब्रीय दहशतवादी?
हायब्रीड दहशतवादी हे सामान्य लोकांसारखे जगणारे परंतु गुप्तपणे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्यांना हायब्रिड दहशतवादी म्हटले जाते. हे हायब्रिड दहशतवादी, दहशतवादी म्हणून सूचीबद्ध नसतात परंतु दहशतवादी हल्ला करण्यासाठी ते पुरेसे कट्टरपंथी असतात.

हे असे लोक असतात ज्यांची नावे कोणत्याही दहशतवादी वॉन्टेड यादीत नसतात. मात्र, हे लोक इतके कट्टरपंथी असतात की, कोणत्याही वेळी दहशतवादी कारवाया करून पुन्हा आपल्या सामान्य जीवनाची सुरुवात करतात. अशा दहशतवाद्यांना ओळखणे कठीण असते.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दोघांकडे दोन एके-५६, ४ मॅगजिन, १०२ राऊंड गोळ्या, २ हँड ग्रेनेड आणि २ पाउच इतका मोठा साठा त्यांच्याकडे सापडला.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, “सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे आणि योग्य कारवाईमुळे चकमक टळली आणि दोन्ही हायब्रिड दहशतवाद्यांना जिवंत ताब्यात घेत आले.” पोलिसानी या दोन्ही दहशतवाद्यांविरोधात एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. काश्मीरच्या खोऱ्यातील दहशतवाद संपवण्याच्या दिशेने सैन्याची जोरदार कारवाई सुरू झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीत भाविकांचे दागिने ओरबाडणारा श्रीरामपूरचा सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेवर डल्ला मारणार्‍या एका अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. तामिळनाडूमध्ये...