Sunday, November 3, 2024
Homeमुख्य बातम्यादोन डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस

दोन डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस

नाशिक। प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात(Mhalsakore Primary Health Center ) एक ते दीड वर्षांपूर्वी रूजू झालेल्या दोन डॉक्टरांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून दोन्ही डॉक्टरांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.खुलासा समाधानकारक न आल्यास कायमचा घरचा रस्ता दाखवण्याचा विचार प्रशासन करत आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रतिक सदगीर व डॉ.सलोनी जनवीर यांची एक ते दीड वर्षांपासून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र हे दोन्ही डॉक्टर प्रारंभीपासूनच वादग्रस्त ठरले. रूग्णांशी अरेरावी, न सांगताच दांंडी मारणे हे नित्याचेच झाले होते. दोन्ही डॉक्टरांची ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली असताना त्यांनी हेतुपूरस्कर रूग्णांना सेवा देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहाते यांना प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन प्रत्यक्षातील स्थिती जाणून घेण्याची सूचना केली होती.त्यानुसार डॉ. नेहाते यांनी म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता दोन्ही डॉक्टर सात दिवसांपासून गैरहजर असल्याचे आढळून आले.

तेथे उपस्थित रूग्णांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दोन्ही डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांचे म्हणणे येईपर्यंत डॉ.सदगीर यांची मालेगाव तालुक्यातील मळगाव व डॉ. जनवीर यांची सुरगाणा तालुक्यातील बारी येथे तडकाफडकी बदली करण्यात आली.आता ते काय खुलासा करता यावर त्यांचे भवितव्य अवलंबुन आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या