Tuesday, September 29, 2026
Homeनगरश्रीगोंद्यात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

श्रीगोंद्यात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

एलसीबीची कारवाई, 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त || दोन ताब्यात, तिघे फरार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

श्रीगोंदा येथे दरोडा, जबरी चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई 28 सप्टेंबर रोजी रात्री कणशेवाडी गावच्या शिवारात करण्यात आली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, गणेश धोत्रे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, सतीष भवर, रोहित येमुल, सागर ससाणे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अरूण मोरे व जालींदर साखरे यांचे पथक गस्तीवर असतना कणशेवाडी-श्रीगोंदा मार्गावर काही जण मोटारसायकलीवरून दरोडा घालण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला.

- Advertisement -

दोन मोटारसायकलींवरून आलेल्या संशयितांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून राहुल उर्फ ठोल्या जसका उर्फ लंगडया काळे (वय 23, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) व प्रविण महेंद्र चव्हाण (वय 18, रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) यांना ताब्यात घेण्यात आले. अंधाराचा फायदा घेत तिघे जण पसार झाले. ताब्यातील आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पसार आरोपी जसका उर्फ लंगडया अंकुश काळे, सागर अंकुश काळे आणि ज्योल्या उर्फ करण जसका उर्फ लंगडया काळे हे तिघेही रांजणगाव मशीद (ता. पारनेर) येथील असून सध्या पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीत राहुल काळे याने श्रीगोंदा येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपींची झडती घेतली असता दोन मोटारसायकली, एक कोयता, एक कटावणी व मिरचीपूड असा एकूण 1 लाख 90 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जेवणावळीवर ‘एफडीए’ची कारवाई

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या सुमारे दोन हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करणार्‍या शेंडी (ता. अहिल्यानगर) येथील सावता केटरर्सकडे अन्न...