Wednesday, September 30, 2026
HomeनगरPune : श्रीगोंदा येथील तलाठ्याने तरुणीसोबत संपवलं जीवन

Pune : श्रीगोंदा येथील तलाठ्याने तरुणीसोबत संपवलं जीवन

जुन्नर तालुक्यात कोकणकडा परिसरातील घटना

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात एका 40 वर्षीय तलाठ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांचे मृतदेह जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत आढळून आले आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे. या दोघांनीही लिहिलेल्या स्वतंत्र सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांचे मृतदेह जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली, जेव्हा पोलिसांना कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला सापडल्या. दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर, रेस्क्यू टीमने दरीतून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. प्राथमिक तपासात दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळी दोघांच्याही स्वतंत्र सुसाइड नोट सापडल्य आहेत, ज्यात त्यांनी आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. रामचंद्र पारधी हे श्रीगोंदा येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात नोंदवली होती. दुसरीकडे, रुपाली खुटाण देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता. जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढर्‍या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास सुरू झाला.

आत्महत्या नोटमध्ये गंभीर आरोप
तलाठी रामचंद्र पारधी यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आई-वडील व भावाची माफी मागतो. माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा’. तर, रुपाली खुटाण हिने देखील आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून आपल्या आईवडिलांकडून होणार्‍या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, दोघांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : दरोड्याच्या तयारीत तिघे जेरबंद; दोघे पसार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाट्याजवळील आराध्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, हॉटेल बजरंगच्या बाजूला दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टा,...