Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीक्षेत्र ताहाराबादला ‘पांडुरंग उत्सवा’ची जय्यत तयारी

श्रीक्षेत्र ताहाराबादला ‘पांडुरंग उत्सवा’ची जय्यत तयारी

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

प्रतीपंढरी समजल्या जाणार्‍या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संतकवी महिपती महाराजांच्या समाधी मंदिरात दि.24 ते 28 जुलै रोजी साजर्‍या होणार्‍या व महाराष्ट्रातील लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या ‘पांडुरंग महोत्सवा’ची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर नगरपालिकेसाठी आ. विखेंची मोर्चेबांधणी सुरु

प्राचीन परंपरेनुसार श्रीक्षेत्र पंढरपूर येथून मूळ लावून पंढरीच्या विठोबाला अगत्याने श्रीक्षेत्र ताहाराबाद क्षेत्री आणण्यासाठी आषाढवारीसाठी गेलेले असंख्य वारकरी आता प्रती पंढरीकडे परतीच्या मार्गावर आहेत. या पायी दिंडी सोहळ्याचे शुक्रवार दि.22 जुलै रोजी प्रती पंढरीत आगमन होणार आहे. श्रीसंतकवी महिपती महाराजांच्या ‘चित्ती धरीली वासना, सिद्धी न्यावी नारायणा’ या ओवीनुसार साक्षात पंढरीचा पांडुरंग महिपती महाराजांच्या भेटीसाठी श्रीक्षेत्र ताहाराबादला येणार म्हणून पंचक्रोशीत भक्तीभावाचे तरंग उठले आहेत. या पायी दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी परिसरातील भाविक सज्ज झाले आहेत.

भंडारदरा ओव्हरफ्लो वाढला

श्रीक्षेत्र पंढरपूर निवासी पांडुरंगाचे श्रीक्षेत्र ताहाराबादला महिपती महाराजांच्या भेटीसाठी आगमन होताच राज्यातील 300 ते 400 पायी दिंडी पालख्यांचेही रविवार दि.24 जुलै रोजी कामिका एकादशीच्या पर्वणीला श्रीक्षेत्र ताहाराबादला आगमन होणार आहे. एकादशीनिमित्त दुपारी 12 वाजता पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष नाना महाराज गागरे, दुपारी 4 वाजता सुधाकर महाराज आहेर व रात्री 8 वाजता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे.

मुळात 17011 दलघफू पाणीसाठा

सोमवार दि. 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजता रामदास महाराज क्षीरसागर, दुपारी 4 वाजता मनोहर महाराज सिनारे व रात्री 8 वाजता एकनाथ महाराज चत्तर यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवार दि.26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता बाळकृष्ण महाराज कांबळे, दुपारी 4 वाजता महंत रामगिरी महाराज (सरलाबेट) यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा नयनरम्य सोहळा साजरा होणार आहे. बुधवार दि.27 जुलै रोजी छबिना मिरवणूक, पूजा, नैवेद्य, आरती व शिळा गोपाळकाला आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

मुळा उजवा कालव्याच्या दुरूस्तीसाठी 10 कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता

गुरुवार दि.28 जुलै रोजी लाखो भाविकांची श्रद्धा असलेला ‘पाऊलघडी’चा अविस्मरणीय सोहळा पहाटे 5 वाजता होणार आहे. या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, ज्येष्ठ विश्वस्त माजी खा. प्रसाद तनपुरे, आसाराम ढूस, डॉ.तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, सुरसिंग पवार, दादासाहेब इंगळे, डॉ. सुखदेव हारदे, बाबासाहेब वाळुंज, अशोक देशमुख, दत्तात्रय जगताप, रमेश नालकर, मच्छिंद्र कोहकडे, शिवाजी बंगाळ, अ‍ॅड. अशोक किनकर, सुभाष शिरसाठ, शिवाजी कोळसे, सतीश क्षीरसागर, बापूसाहेब गागरे, श्रीकृष्ण कांबळे, संजय कांबळे, सुशीला वराळे, सुशीला मुसमाडे, सुगंधाबाई बानकर, लक्ष्मीबाई सोनवणे, सचिव बाळासाहेब मुसमाडे आदींसह भाविकांनी केले आहे.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावरच इच्छुकांचे भवितव्य ठरणार

कामिका एकादशीच्या पर्वणीला दिलीप जगताप यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक होईल. जगताप परिवाराने देवस्थान व प्रती पंढरीसाठी सहकार्य केले आहे. जगताप कन्स्ट्रक्शन व भोसले कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून गावातील रस्ते व वाहनतळे यांची दुरुस्ती करण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्राचीन धार्मिक परंपरेनुसार हा उत्सव 7 दिवस सुरू असतो. नवमीला पांडुरंगाचे श्रीक्षेत्र ताहाराबादच्या पवित्रभूमीत आगमन होते. त्यानंतर 7 दिवस भाविकांचा पाहुणचार घेऊन अमावस्येला पांडुरंग आपल्या पंढरीला प्रस्थान ठेवतात. ‘पाऊलघडी’च्या सोहळ्यात पहाटे महिपतींच्या देऊळवाड्यात अंथरलेल्या गुलाल-बुक्क्यावर पांडुरंगाने पंढरीकडे प्रस्थान ठेवल्याच्या साक्षात ‘पाऊलखुणा’ उमटतात. त्याचे दर्शन घेऊन लाखो भाविकांची मांदियाळी धन्य झालेली असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या