Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात करोनाचे ‘वन-डे’ शतक

श्रीरामपूर तालुक्यात करोनाचे ‘वन-डे’ शतक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा काल शंभरीपार गेला असून बाधितांचा एकूण आकडा 1434 वर जाऊन पोहचला आहे.

- Advertisement -

तर शहरातील एका शाळेच्या 55 वर्षीय मुख्याध्यापकाचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल एकूण 63 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यात 34 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्हा रुग्णालयात 9 तसेच खासगी प्रयोग शाळेत 58 असे सर्व मिळून कालच्या दिवशी 101 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आले आहेत.

शनिवारी नगरला श्रीरामपूर येथे घेण्यात आलेल्या 16 जणांने घशाचे स्त्राव तपासतपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते अहवाल अद्यापही आले नाहीत. काल पुन्हा 20 जणांच्या घशाचे स्त्राव घेवून ते तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे नगर येथून अद्याप 36 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.

या डॉ. आंबेडकर वसतिगृहात घेतलेल्या रॅपीड टेस्ट मध्ये पॉझिटीव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये वॉर्ड नं. एक -09, वॉर्ड नं. सात-7, वॉर्ड नं. चार-1, निपाणीवडगाव 2, दत्तनगर-2, टाकळीभान-1, बेलापूर-2, हरेगाव-1, प्रगतीनगर-6, इंदिरानगर-1, मातापूर-3 असे 34 रुग्णांचा समावेश आहे.

काल 34 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर 98 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. श्रीरामपूर येथील 08 जणांना श्रीरामपूरहून दुसर्‍या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

शहरातील एका एका शाळेतील 55 वर्षीय मुख्याध्यापकाला 6 तारखेला त्रास होवू लागल्याने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील एका खासगी रुगणालयात दाखल करण्यात आले. काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 3150 जणांची चाचणी करण्यात आली असून यात आतापर्यंत 1434 पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या