Monday, October 5, 2026
Homeक्राईमCrime News : श्रीरामपूरचा सराईत गुन्हेगार जेरबंद

Crime News : श्रीरामपूरचा सराईत गुन्हेगार जेरबंद

पोलीस असल्याची बतावणी करून करायचा फसवणूक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस असल्याची खोटी बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणार्‍या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. सज्जाद गरीब शहा इराणी (वय 47, रा. इराणी गल्ली, वार्ड नंबर 1, श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान त्याने तोफखाना व संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. त्याचा चुलत भाऊ मुस्लीम यासीन इराणी (रा. इराणी गल्ली, वार्ड नंबर 1, श्रीरामपूर) याने देखील त्याला या गुन्ह्यात मदत केली असल्याचे समोर आले आहे. तो पसार आहे. रवींद्र नारायण राजहंस हे 9 ऑगस्ट 2025 रोजी सावेडी उपनगरातील जॉगिंग पार्कजवळ थांबले असताना दोन संशयितांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगून फसवले होते.

राजहंस यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान, हा गुन्हा सज्जाद इराणी याने केल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने व त्याच्या चुलत भावाने मिळून गुन्हा केल्याची कबूली दिली.

सज्जादचा गुन्हेगारी इतिहास
सज्जाद इराणी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी घेतली असता, त्याच्याविरूध्द मुंबई, जळगाव, पिंपरी चिंचवड, पुणे शहर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे 23 नोंदवलेले गुन्हे आढळले, तसेच या व्यतिरिक्तही आणखी सुमारे 100 ते 125 गुन्हे असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विखे-शिंदे-थोरात एकत्र बसणार!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात...