Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

श्रीरामपूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील 15 जानेवारी रोजी झालेल्या 26 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवार दि. 18 जानेवारी 2021 रोजी होत असून

- Advertisement -

त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

सोमवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी अधीक्षक, सहाय्यक मतमोजणी अधिकारी व शिपाई असे तीन जण राहणार असून अशा 14 टेबलवर एकूण 42 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच नायब तहसीलदार दीपक गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच राखीव कर्मचारी अधिकारी म्हणून 5 जणांची नियुक्ती करण्यात आली असून या मतमोजणीसाठी 55 जण काम करणार आहेत. मतमोजणी कक्षात 14 टेबल मांडण्यात आले असून 11 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे.

दि. 15 जानेवारी रोजी ब्राह्मणगाव वेताळ, नायगाव, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर, एकलहरे, लाडगाव, गळनिंब, महांकाळवडगाव, घुमनदेव, वळदगाव, मातापूर, सराला, गोवर्धनपूर, भेर्डापूर, गोंडेगाव, मालुंजा, खोकर, मुठेवाडगाव, कारेगाव, पढेगाव, निपाणी वडगाव, बेलापूर खुर्द, वडाळा महादेव, टाकळीभान, बेलापूर बुद्रुक या 26 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले असून तेथील 577 उमेदवारांचे बंद असलेले भवितव्य आज उघडणार आहे. त्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या फेरीत ब्राह्मणगाव वेताळ, नायगाव, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर,एकलहरे, लाडगाव, गळनिंब, महांकाळवडगाव, घुमनदेव, वळदगाव, मातापूर, सराला, गोवर्धनपूर या ग्रामपंचायत. चौथ्या फेरीत भेर्डापूर, गोंडेगाव, मालुंजा, खोकर. पाचव्या फेरीत खोकर, मुठेवाडगाव, कारेगाव, पढेगाव. सहाव्या व सातव्या फेरीत पढेगाव, निपाणी वडगाव, बेलापूर खुर्द, वडाळा महादेव तर आठ ते दहाव्या फेरीत वडाळा महादेव, टाकळीभान, बेलापूर बुद्रुक अशी मतमोजणी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या