Thursday, June 11, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरातील बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभाग अ‍ॅक्शन मोडवर

Shrirampur : श्रीरामपुरातील बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभाग अ‍ॅक्शन मोडवर

मोरगेवस्ती परिसरात दोन पिंजरे लावले, तिसरा आज लावणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शनिवारी रात्री मोरगेवस्ती परिसरात फिरताना तीन ते चार बिबटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाले होते. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. त्याची गंभीर दखल तातडीने घेत काल दिवसभर वन विभागाचे कर्मचारी परिसरात तळ ठोकून होते. बिबट्यांना पकडण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले असून आणखी एक पिंजरा आज लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisement -

शनिवारी रात्री ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सागर जावळे यांच्या घराजवळ एकाच वेळी तीन बिबट्यांनी फेरफटका मारला. हे बिबटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोरगेवस्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनी या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडे मागणी केली होती. काही अनूचित प्रकार घडू नये म्हणून वन विभागाचे अधिकारीही अ‍ॅक्शन मोडवर आले. काल दिवसभर ते मोरगेवस्ती परिसरात तळ ठोकून होते. दिवसभर त्यांनी नागरिकांच्या मदतीने बिबट्यांचा माग काढत दोन ठिकाणी पिंजरे लावले. तर आणखी एका पिंजर्‍याची व्यवस्था आज होणार असल्याने त्यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षापूर्वी या भागात भर दिवसा बिबट्याने शिरकाव करून धूमाकुळ घातला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकार्‍यांना मोठी कसरत करावी लागली होती. बिबट्याने जवळपास दोन ते तीन नागरिकांना जखमीही केले होते. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या पथकातील एका कर्मचार्‍यावर या बिबट्याने हल्ला केला होता. यात गंभीर जखमी वन विभागाच्या कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता पुन्हा एक नव्हे तर तब्बल तीन बिबटे या भागात संचार करीत असल्याने परिसरात बिबट्यांची दहशत पसरली आहे. काल दिवसभर वनविभागाचे वनपाल श्री. गिरी, श्री. सानप, वनरक्षक अक्षय बडे, संतोष सुरासे, वाहन चालक रोहित बकरे हे तळ ठोकून होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...