Tuesday, February 10, 2026
HomeनगरCrime News : श्रीरामपूरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Crime News : श्रीरामपूरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ || पीडितेची फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

हुंड्याच्या स्वरूपात वारंवार पैशांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहित महिलेने (वय 22) पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑगस्ट 2022 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आपल्याला सातत्याने मारहाण, शिवीगाळ, उपाशी ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे तसेच अखेर घरातून हाकलून देण्यात आल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी पीडितेच्या पती सुफियान उसमान शेख, सासु परविन उसमान शेख, दीर रोशन जमीर शहा, जाव आयशा रोशन शहा, आजी सासु जुबेदा ईसाक शेख व आजी सासरे ईसाक आब्बास शेख (सर्व रा. वार्ड नंबर 2, श्रीरामपूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह फेब्रुवारी 2022 रोजी सुफियान शेख याच्याशी झाला. विवाहानंतर सुरूवातीचे सात महिने संसार सुरळीत सुरू होता. पतीचा डिजिटल अ‍ॅक्सेसरीज मोबाईल दुकानाचा व्यवसाय असून, त्याच व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी पती व सासरच्या मंडळींकडून करण्यात येत होती. आई-वडिलांकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतरही पतीकडून शिवीगाळ व मारहाण सुरू झाली.

YouTube video player

मला तू पसंत नाहीस अशा शब्दांत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. सासू, दीर, जाव तसेच आजी सासू व आजी सासरे हे देखील पतीला चिथावणी देत असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. दरम्यान फिर्यादीच्या आई-वडिलांनी वाद मिटवण्यासाठी वेळोवेळी रोख स्वरूपात सुमारे एक लाख रूपये दिले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेने भरोसा सेलकडे तक्रार दिली. समेटाच्या प्रयत्नानंतरही सासरच्या मंडळींकडून त्रास सुरूच राहिला. समेट न झाल्याने दिलासा सेल यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्यानंतर फिर्यादीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गुन्हेगारांच्या पध्दतींचा एकत्रित डेटा करण्यासाठी प्रयत्न करणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक गुन्ह्यांमध्ये एकाच पध्दतीने गुन्हे केल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, सध्या गुन्हेगारांची ‘मोडस ऑपरेंडी’ (गुन्हा करण्याची...