Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील इंजिनिअर तरुणाचा म्युकरमायकोसिसने दुर्दैवी मृत्यू

श्रीरामपुरातील इंजिनिअर तरुणाचा म्युकरमायकोसिसने दुर्दैवी मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील एका इंजिनिअर असलेल्या 27 वर्षीय तरुणाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता.

- Advertisement -

या तरुणास गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याने येथील श्रीरामपुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन घरी गेला होता. मात्र दोन दिवसानंतर 21 मे रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पुणे येथील रुबी हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यास म्युकरमायकोसिस झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरु केले. त्यास 100 इंजेक्शनची गरज होती. उपचारासाठी मदत म्हणून सोशल मीडियावर आवाहन केले असता अनेकांनी त्यास मदतही केली. त्याच्या डोळ्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र काल त्यास जास्त त्रास होऊ लागल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील रयत शिक्षण संस्थेत सेवेत असून त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, पत्नी, एक बहिण असा परिवार आहे.

हा 27 वर्षीय तरुणाचा विवाह सुमारे एक वर्ष झाले होते. हा तरुण इंजिनिअर असून तो बारामती पाटस येथील अ‍ॅग्रीकल्चरल कंपनीत नोकरीस होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या