Monday, April 27, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूर नगरपालिकेत ‘कही खुशी, कही गम’!

Shrirampur : श्रीरामपूर नगरपालिकेत ‘कही खुशी, कही गम’!

प्रभागनिहाय आरक्षण जाहीर || काही दिग्गजांची अडचण तर काहींना सुवर्णसंधी || अनेक नवीन चेहर्‍यांना मिळणार संधी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण अखेर काल जाहीर झाले. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांना निवडणुकीची संधी निर्माण झाली असून, काही प्रभागांच्या आरक्षणात बदल झाल्याने तेथील इच्छुकांना पर्यायी जागा शोधावी लागणार आहे.

- Advertisement -

नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले त्यामुळे कोणत्याही खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळू शकते. नगरपरिषदेच्या 17 प्रभागांतील एकूण 34 जागांसाठी आरक्षण जाहीर झाले. शहरातील 17 प्रभागांमध्ये ओबीसी, सर्वसाधारण तसेच एससी असे आरक्षण पडले आहे. विशेषत प्रभाग 15 मध्ये दोन्ही जागा सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत, त्यामुळे येथे मोठी चुरस पाहायला मिळेल. नगरपालिका शाळांमधील लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली.

काल सकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपमुख्याधिकारी महेंद्र ताकपिरे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे, आरपीआय या प्रमुख पक्षांसह अन्य पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते, माजी व भावी नगरसेवकांसह नागरिक उपस्थित होते.

प्रभाग 1 – नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरूष), सर्वसाधारण (महिला), प्रभाग 1 ची लोकसंख्या 5707 असून यामध्ये झिरंगे वस्ती, सोनावणे वस्ती, लक्ष्मीनारायणनगर, गुरुनानकनगर, महादेव मंदिर परिसर, फातेमा हौसिंग सोसायटी, आरसीसी साठवण तलाव, डावखर लॉन परिसर.

प्रभाग 2 – अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण (पुरुष), प्रभाग 2 मध्ये 5532 लोकसंख्या असून यामध्ये एज्यूकेशन हायस्कूल परिसर, आंबेडकर कॉलनी, अण्णाभाऊ साठेनगर, सेंट बापटीस्ट चर्च, वैदुवाडा, वडारवाडा, कंपोस्ट डेपो, गिरमे वस्ती, सुतावणेवस्ती परिसर, शेडगे मळा, अचानकनगर, जुने तहसील, मिनी स्टेडियम.

प्रभाग 3 – अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण (पुरुष), प्रभाग 3 मध्ये 5499 लोकसंख्या असून यामध्ये तहसील कार्यालय परिसर, सेंट लुक हॉस्पिटल, रेव्हेन्यू कॉलनी, सिद्धार्थनगर, बोरावकेनगर, बोरावके कॉलेज परिसर, आशीर्वादनगर.

प्रभाग 4 – ओबीसी (पुरूष), सर्वसाधारण (महिला), प्रभाग 4 मध्ये लोकसंख्या 5785 आहे. यामध्ये आदर्शनगर, पंजाबी कॉलनी, गाडगेबाबा उद्यान, कर्मवीर भाऊराव चौक, कुरेशी मोहल्ला, तांबे चाळ, लक्ष्मी थिएटर, सिंधी कॉलनी, शिरसाठ हॉस्पिटल, इराणी मोहल्ला, महात्मा फुले सोसायटी, सेंट झेविअर्स स्कूल परिसर.

प्रभाग 5 – ओबीसी (महिला), सर्वसाधारण (पुरुष), प्रभाग 5 : लोकसंख्या 5588 यामध्ये काझीबाबा रोड, नेहरूनगर झोपडपट्टी, बागवान गल्ली, गुलाम रसूल मस्जिद परिसर.

प्रभाग 6 – ओबीसी (पुरुष), सर्वसाधारण (महिला), या प्रभागात 5470 लोकसंख्या असून यामध्ये संजयनगर, ईदगाह परिसर, डी.एम. गुळे शाळा, रामनगर, मिल्लतनगर, जुने साठवण तलाव परिसर.

प्रभाग 7 – अनुसूचित जाती (पुरुष), सर्वसाधारण (महिला), या प्रभागात 5777 लोकसंख्या असून यामध्ये वैदुवाडा, बजरंग चौक, गौसिया मस्जिद, रोहिदासनगर, धनगर वस्ती, गोपीनाथनगर, मधुलता गार्डन, संजयनगर पाणी टाकी.

प्रभाग 8 – ओबीसी महिला, सर्वसाधारण (पुरुष), या प्रभागात 5764 लोकसंख्या असून यामध्ये सय्यदबाबा दर्गा, बीफ मार्केट, सुभेदार वस्ती, कुरेशी मोहल्ला, शाळा क्र. 4 व 5, पापा जलाल रोड, मरकस मस्जिद रोड परिसर.

प्रभाग 9 – ओबीसी (पुरुष), सर्वसाधारण (महिल), या प्रभागात लोकसंख्या 4841, यामध्ये बसस्टँड, खटोड मार्केट, शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, कामगार हॉस्पिटल, काँग्रेस भवन, राम मंदिर, भाजी व सोनार मार्केट.

प्रभाग 10 – अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण (पुरुष), यामध्ये 4788 लोकसंख्या असून यामध्ये रेल्वे मालधक्का, कांदा मार्केट, भीमनगर, शिवाजीनगर, खिलारी वस्ती, औद्योगिक वसाहत.

प्रभाग 11 – ओबीसी (महिला), सर्वसाधारण (पुरुष), या प्रभागात 4787 लोकसंख्या असून चौधरी वस्ती, वढणे वस्ती, उत्सव मंगल कार्यालय, थत्ते ग्राउंड, मोरगे हॉस्पिटल परिसर यामध्ये येतो.

प्रभाग 12 – अनुसूचित जाती (पुरुष), सर्वसाधारण (महिला), प्रभाग 12 मध्ये 4869 लोकसंख्या असून नगरपरिषद कार्यालय, जिजामाता चौक, सावतारोड, कुंभार गल्ली, गिरमे चौक, कालिका मंदिर परिसर, के. व्ही. रोड, जुनी घास गल्ली, स्मशानभूमी परिसर व झोपडपट्टी.

प्रभाग 13 – सर्वसाधारण (पुरुष), अनुसूचित जमाती (महिला), या प्रभागात 4865 लोकसंख्या आहे, यामध्ये वडार वाडा, बाजार तळ, शिकलकरी परिसर, तलवार रोड, कॅनललगत झोपडपट्टी, खटोड बालिका विद्यालय, दादा जोशी शाळा परिसर,

प्रभाग 14 – अनुसूचित जाती (पुरुष), सर्वसाधारण (महिला), या प्रभागात 5167 लोकसंख्या आहे. यामध्ये रिमांड होम, गजानन वसाहत, दहावा ओटा, हिंदुस्थान बेकरी, नॉर्दन ब्रांच, चुना भट्टी व झोपडपट्टी, जवाहर कारखाना, गुलमोहर हॉटेल, द्राक्ष माळा रोड परिसर येतो.

प्रभाग 15 – सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण (पुरुष), या प्रभागात 5022 लोकसंख्या आहे. जनता हायस्कूल, सिद्धिविनायक मंदिर, प्रवरा हौसिंग, नामदेव हौसिंग, कानिफनाथ मंदिर रोड, लक्ष्मी आई मंदिर रोड, नवशक्ती रोड परिसर या परिसराचा यामध्ये समाविष्ठ आहे.

प्रभाग 16 – ओबीसी (महिला), सर्वसाधारण (पुरुष), यामध्ये 4927 लोकसंख्या आहे. यामध्ये निवारा हौसिंग, आगाशे हॉस्पिटल, म्हाडा कॉलनी, बोरावकेनगर, पाटणी मळा, रासकरनगर, बोंबलेनगर, चित्तरकथी मोहल्ला, मोरगे वस्ती, काळाराम मंदिर, दिनेश स्कूटर रोड.

प्रभाग 17 – ओबीसी (महिला), सर्वसाधारण (पुरुष) या प्रभागात 4894 लोकसंख्या असून विजय हॉटेल, पुर्णवादनगर, समता कॉलनी, मुळा-प्रवरा कार्यालय, अशोक थिएटर, शिंदे, लबडे वस्ती या परिसराचा समावेश होतो.

त्यांनी आता थांबावे
नगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये तीन, चार, पाच वेळापर्यंत अनेक जण निवडून आले आहेत. आणि आता सुद्धा यातील काही जण इच्छुक आहेत. नव्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी व शहराचा विकास जोमाने करण्यासाठी आता नवीन लोकांना संधी मिळणे आवश्यक असल्याने ज्यांचे तीन तीन, चार चार टर्म झाल्या आहेत, त्यांनी आता थांबावे, या बाबीची दखल घेऊन आता नवीन रक्ताला वाव द्यावा, अशी प्रतिक्रीया तहसील कार्यालयात उपस्थित एका कार्यकर्त्यांने दिली.

अनेक दिग्गजांना द्यावी लागणार ‘सौ.’ना संधी
काल श्रीरामपूर नगरपालिकेच्या 17 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. नगरपालिका शाळांमधील छोट्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. अनेक प्रभागातील आरक्षणात बदल झाल्याने अनेक माजी नगरसेवकांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे, किंवा आपल्या ‘सौ.’ ना संधी द्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

नितेश

Nitesh Rane: मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंना १ वर्षाचा कारावास, नेमकं...

0
मुंबई | Mumbaiमुंबई-गोवा महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सोमवारी (दि. २७ एप्रिल) निकाल...